मुंबईः मुंबई महापालिका निवडणुकीसाठीच्या आरक्षण सोडतीत (Reservation Draw) शिवसेनेने काँग्रेसचे खच्चीकरण केल्याचा खळबळजनक आरोप काँग्रेस नेत्याने केला आहे. वॉर्ड पुर्नरचना आणि आरक्षण सोडतीत शिवसेनेनं (Mumbai ShivSena) स्वत:चा फायदा करुन घेत काँग्रेसच्या जागांवर जाणून बुजून मोठे फेरफार केल्याचा ठपका माजी नगरसेवकाने ठेवलाय. मुंबईत काँग्रेसची ताकद वाढू नये, यासाठी यासाठी शिवसेनेने डाव आखल्याचंही महापालिकेचे माजी विरोधी पक्ष नेते रवी राजा (Ravi Raja) यांनी केला आहे. कालच राज्यातील 14 महापालिकांसाठीची आरक्षण सोडत जाहीर झाली. यात मुंबई महापालिकेचाही समावेश आहे. मुंबई महापालिका निवडणूक येत्या सप्टेंबर महिन्यात होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे इच्छुक नगरसेवक आतापासूनच तयारीला लागले आहेत.
नगरविकास खात्याच्या निर्देशावरुनच प्रशासनानं मुंबईतील वॉर्ड पुर्नरचना आणि आरक्षणात फेरफार केल्याचा आरोप काँग्रेस नेते रवी राजा यांनी केला आहे. ते म्हणाले, ‘वॉर्ड पुर्नरचना आणि आरक्षण सोडतीत शिवसेनेनं स्वत:चा फायदा करुन घेत काँग्रेसच्या जागांवर जाणून बुजून मोठे फेरफार केले. मुंबईत काँग्रेसच्या २९ नगरसेवकांपैकी २१ नगरसेवकांचे वॉर्ड आरक्षण सोडतीत खालसा केले आहे. वॉर्ड पुर्नरचनेपाठोपाठ वॉर्ड आरक्षण सोडतीतही काँग्रेसवर अन्याय आणि शिवसेनेचा फायदा झाल्याची काँग्रेसची भावना असल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली.
मुंबई महापालिका पुनर्रचनेत माजी विरोधी पक्ष नेते रवी राजा , आसिफ झकेरिया, सुफियान वनु , कमरजहाँ सिद्दीकी या काँग्रेसकडून चांगली कामगिरी करणा-या नगरसेवकांचे वॉर्ड आता अडचणीत सापडलेत आहेत. मुंबईत वॉर्ड आरक्षण सोडतीचा सर्वाधिक फटका काँग्रेसला बसलाय. त्यामुळेच मुंबईत शिवसेनेकडून काँग्रेसचे खच्चीकरण केले जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे. यावर येत्या आठवड्यात मुंबईत चिंतन शिबीर घेऊन मुंबईतील काँग्रेस नेते चर्चा करणार आहेत.
मुंबई महापालिकेत एससीच्या एकूण जागा 15 आहेत. त्यात महिलांसाठी 8 जागा राखीव आहेत. एसटीसाठी एकूण 2 जागा आहेत. त्यापैकी एक जागा महिलांसाठी राखीव आहे. सर्वसाधारण महिलांसाठी 219 जागा आहेत. त्यात महिलांसाठी 109 जागा राखीव आहेत.
60, 85, 107, 119, 139, 153, 157, 162, 165, 190, 194, 204, 208, 215, 221
55, 124शिवसेनेकडून जाणीवपूर्वक मुंबईत काँग्रेसची ताकद वाढू नये याकरता प्रयत्न होत आहेत. त्यावर तोडगा काढू असे महापालिकेतील काँग्रेसचे विरोधी पक्ष नेते रवी राजा यांनी सांगितले