मुंबई : मुंबई महापालिकेची निवडणूक (Mumbai Municipal election) वर्षभरावर आली असताना नगरसेवक निधी वाटपात शिवसेनेने (Shiv Sena) खेळी केल्याचा आरोप होत आहे. नगरसेवक विकास निधी वाटपात शिवसेनेकडून भाजपची (Shiv Sena vs BJP) कोंडी केल्याचाही आरोप आहे. सत्ताधारी शिवसेनेनं निधी वाटपात आपल्या नगरसेवकांसह काँग्रेस, राष्ट्रवादी आणि समाजवादी पक्षाला निधी देताना हात सैल, तर भाजपला निधी वाटतांना मात्र सेनेने हात आखडता घेतल्याचं चित्र आहे. (BMC election shiv sena gives more fund to its corporators than BJP Ashish Shelar vs Yashwant Jadhav)
स्थायी समितीच्या 650 कोटी निधीपैकी सर्व नगरसेवकांना प्रत्येकी 1 कोटी याप्रमाणे 227 कोटी रुपयांचे वाटप करण्यात आलं आहे. त्यानंतर स्थायी समिती अध्यक्षांनी त्यांच्या अधिकारात केलेल्या वाटपात मात्र मोठी तफावत आहे. महापालिकेत शिवसेनेचे 97 नगरसेवक असून त्यांना 233 कोटी निधीचे वाटप करण्यात आले.
तर भाजपचे 83 नगरसेवक असून त्यांना केवळ 60 कोटी रुपयांचा निधी देण्यात आला. मात्र कॉंग्रेसचे 29 नगरससेवक असून त्यांना संख्येच्या तीनपट म्हणजे 90 कोटींचा निधी देण्यात आला आहे. राष्ट्रवादीचे 8 नगरसेवक असून त्यांना 21 कोटी, तर समाजवादीचे 6 नगरसेवक असून त्यांना 18 कोटींचा निधी देण्यात आला आहे.
“स्थायी समिती अध्यक्ष हे मुंबई मनपाच्या अर्थसंकल्प आणि निधीवर स्वत:चा हक्क गाजवत आहेत. त्यांनी यशवंत जाधव प्रायव्हेट लिमिटेड कंपनी अशा भ्रमात राहू नये. हा मुंबईकरांचा पैसा आहे, मुंबईकरांनी कररुपाने दिला आहे. संपूर्ण मुंबईत समान विकास व्हावा. असमान विकासातून राजकारणात विषमता निर्माण करणं यापद्धतीने शिवसेनेचं काम सुरु आहे. 29 नगरसेवक असणाऱ्या काँग्रेसला 81 कोटी आणि ज्या भागामध्ये भाजप नगरसेवक आहेत, त्या 83 प्रभागात केवळ 60 कोटी, या पद्धतीची विषमत करण्याचं पाप जाधवसाहेब तुम्हाला का सुचलं? स्वत:च्या पक्षाला, 90 नगरसेवकांसाठी 230 कोटी आणि भाजपच्या 83 नगरसेवकांसाठी 60 कोटी म्हणजे भाजपला निवडून देणाऱ्या जनतेने पाप केलंय का, असा सवाल आशिष शेलार यांनी विचारला.
“स्वत:च्या प्रभागात 40 कोटी आणि इतर पक्षातील नगरसेवकाला शून्य, या विषमतेचा प्रकार शिवसेना करत आहे. हे पाप आहे, येणाऱ्या निवडणुकीत जनता शिवसेनेला धडा शिकवेलठ, असा हल्लाबोल आशिष शेलार यांनी केला.
दरम्यान, स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी आशिष शेलार यांच्यावर पलटवार केला आहे. “मी 30 कोटी निधी घेतल्याचे सिद्ध करा, मी राजीनामा देईन अन्यथा तुम्ही तुमचे तोंड काळे करा. आहे का हिंमत? उगीच भुंकू नका”, असा घणाघात यशवंत जाधव यांनी केला.
आशिष शेलार, तुम्हीही प्रायव्हेट लिमिटेड कंपनी उघडून बसलाय का? आमदार असतानाही या पालिकेत तुमचं काय गाडलंय, का लक्ष देताय? तुमचे पालिकेतील नेते अकार्यक्षम असल्यानं तुम्ही नेहमी लक्ष घालताय का? सर्व गटनेत्यांच्या सहमतीनं निधीचे वाटप झाले आहे, असं स्पष्टीकरण यशवंत जाधव यांनी दिलं.
संबंधित बातम्या
BMC Budget 2021 updates live : 39 हजार कोटींचं बजेट सादर, मालमत्ता करात सरसकट माफी नाही
मुंबईकरांवर कराचा बोजा नाही, महापालिकेचा 33 हजार 441 कोटींचा अर्थसंकल्प सादर
(BMC election shiv sena gives more fund to its corporators than BJP Ashish Shelar vs Yashwant Jadhav)