शिवसेना-नारायण राणे वादाचा नवा अंक, BMC ची राणेंना नोटीस, अधिश बंगल्याची पाहणी करणार

| Updated on: Feb 18, 2022 | 11:18 AM

भाजपचे नेते आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या जुहू येथील निवासस्थान "अधिश" या बंगल्याची पाहणी करण्याकरता आज मुंबई महानगरपालिकेचे अधिकारी येणार असल्याची माहिती आहे.

शिवसेना-नारायण राणे वादाचा नवा अंक, BMC ची राणेंना नोटीस, अधिश बंगल्याची पाहणी करणार
नारायण राणे, केंद्रीय मंत्री
Follow us on

मुंबई : शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी 15 फेब्रुवारीला पत्रकार परिषद घेऊन भाजप (BJP) नेत्यांवर जोरादर टीका केली होती. संजय राऊत यांनी भाजप नेते देवेंद्र फडणवीस, किरीट सोमय्या आणि मोहित कंबोज यांच्यावर आरोप केले होते. भाजपकडून नारायण राणे यांनी पत्रकार परिषद घेत प्रत्युत्तर दिलं होतं. नारायण राणे (Narayan Rane) आणि शिवसेना यांच्यातील वादाचा पुढचा अंक पाहायला मिळणार आहे. भाजपचे नेते आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या जुहू येथील निवासस्थान “अधिश” या बंगल्याची पाहणी करण्याकरता आज मुंबई महानगरपालिकेचे अधिकारी येणार असल्याची माहिती आहे. त्या संदर्भातली नोटीस देखील नारायण राणे यांना पाठवलेली आहे. मुंबई महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी यापूर्वी देखील नारायण राणे यांच्या बंगल्याची पाहणी केली होती.

बंगल्याच्या बांधकामात सीआरझेडचं उल्लंघन झाल्याचा आरोप

जुहू चौपाटीवर अगदी हाकेच्या अंतरावरती केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचा हा बंगला आहे. यापूर्वी देखील काही अधिकाऱ्यांकडून या बंगल्याची पाहणी करण्यात आले होते. या बंगल्याच्या बांधकामांमध्ये सीआरझेड नियमांचं उल्लंघन, अनधिकृत बांधकाम आणि FSI चा वाढीव उपयोग केला गेला आहे, असे काही आरोप लावण्यात आले होते.

पत्रकार परिषदेनंतर पुन्हा नोटीस दिल्याची चर्चा

काही दिवसांपूर्वी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी एक पत्रकार परिषद घेत शिवसेनेच्या अनेक नेत्यांवर आरोप केले होते याच संदर्भात त्यांच्या बंगल्याला ही पालिकेची नोटीस दिली गेली आहे का? अशी देखील राजकीय वर्तुळात चर्चा रंगत आहेत. पण येत्या काळात राणे विरुद्ध शिवसेना पुन्हा एकदा आमने-सामने येताना पाहायला मिळणार आहे का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

किरीट सोमय्या कोर्लईच्या दौऱ्यावर

किरीट सोमय्या आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे आणि माजी मंत्री रविंद्र वायकर यांच्या पत्नी मनिषा वायकर यांच्या कोर्लई येथील जागेवर जाऊन 19 बंगले अस्तित्वात आहेत की नाहीत याची पाहणी करणार आहेत.

इतर बातम्या :

VIDEO: किरीट सोमय्या वेडा माणूस, भाजपला भुताटकीनं झपाटलं; राऊतांची जोरदार टोलेबाजी

The Kapil Sharma Show: कपिल शर्माने श्रीराम नेनेंवर केला विनोद, माधुरीची अशी रिअॅक्शन; व्हिडीओ तुम्ही पाहिला का ?