ऑनलाईन दर्शन ते निर्जंतुकीकरणाची व्यवस्था, मुंबई महापालिकेकडून नवरात्रौत्सवासाठी मार्गदर्शक सूचना जारी

| Updated on: Oct 09, 2020 | 4:55 PM

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेने यंदाच्या नवरात्रौत्सवाच्या मार्गदर्शक सूचना जारी केली आहे. (BMC Issue New Guidelines for Navratri 2020)

ऑनलाईन दर्शन ते निर्जंतुकीकरणाची व्यवस्था, मुंबई महापालिकेकडून नवरात्रौत्सवासाठी मार्गदर्शक सूचना जारी
bmc
Follow us on

मुंबई : गणेशोत्सवानंतर आता सर्वांना नवरात्रौत्सवाचे वेध लागले आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेने यंदाच्या नवरात्रौत्सवाच्या मार्गदर्शक सूचना जारी केली आहे. यानुसार गणेशोत्सवादरम्यान पालन केलेली कार्यपद्धती नवरात्रौत्सवात देखील लागू केले जाणार आहे. या मार्गदर्शक सूचनांचे काटेकोरपणे पालन करण्याचे आवाहन पालिकेने केलं आहे. (BMC Issue New Guidelines for Navratri 2020)

या मार्गदर्शक सूचना गणेशोत्सवादरम्यान देण्यात आलेल्या सूचना आणि कार्यपद्धतीनुसार आहेत. या अंतर्गत प्रामुख्याने मूर्तीकारांना मंडप उभारण्याची परवानगी देण्याविषयी अधिक सुलभ कार्यपद्धती आणि ‘कोविड’ संदर्भातील हमीपत्र इत्यादी बाबींचा समावेश आहे. तसेच सार्वजनिक मंडळांकरिता कमाल 4 फूट, तर घरगुती देवींच्या मूर्तींची उंची 2 फुटांच्या मर्यादेत असावी, ही सूचना देण्यात आली आहे.

त्याचबरोबर देवीच्या दर्शनाची सुविधा ऑनलाईन पद्धतीने देण्याबाबत व्यवस्था करण्यात यावी. सर्व मंडपांमध्ये निजंर्तुकीकरणाची व्यवस्था करण्यासह शारीरिक दूरीकरणाचे पालन काटेकोरपणे करण्यात यावे, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.

नवरात्रौत्सवाच्या मार्गदर्शक सूचना

  • वारंवार हात वारंवार साबणाने धुणे.
  • सार्वजनिक ठिकाणी ‘मास्क’चा (मुखपट्टी) सुयोग्यप्रकारे वापर करणे.
  • दोन व्यक्तींमध्ये किमान 2 मीटरचे अंतर राखणे
  • देवीच्या दर्शनाची सुविधा ऑनलाईन पद्धतीने करणे
  • सर्व मंडपांमध्ये निर्जंतुकीकरणाची व्यवस्था
  • सार्वजनिक मंडळांकरिता कमाल 4 फूट, तर घरगुती देवींची मूर्तींची उंची 2 फूट असावी

मूर्तीकारांच्या मंडपांसाठीचे अर्ज स्वीकारण्यास असलेला कमी अवधी आणि कोरोना प्रादुर्भाव लक्षात घेता यावर्षी परवानगी देण्याच्या पद्धतीत अंशतः बदल करण्यात येत आहे. मागील वर्षी ज्या मूर्तीकारांना परवानगी दिली आहे, अशा मूर्तीकारांचे अर्ज यावर्षी स्थानिक/वाहतूक पोलिसांकडे पाठवू नये. गेल्या वर्षीची पोलीस परवानगी ग्राह्य धरावी. तसेच विभाग कार्यालयातर्फे छाननी करुन त्यांना परवानगी देण्यात येत आहे.

मात्र, नव्याने व प्रथमतः अर्ज करणाऱ्या मूर्तीकारांच्या अर्जांची छाननी पूर्वीप्रमाणेच स्थानिक/ वाहतूक पोलीस तसेच विभाग कार्यालयामार्फत करण्यात येत आहे.

‘कोविड-१९’ या साथरोगाच्या पार्श्वभूमीवर आवश्यक बाबींबाबत मूर्तीकारांकडून मंडप उभारणी अर्जासह हमीपत्र घेण्यात येत आहेत. हे हमीपत्र गणेशोत्सवादरम्यान प्रसारित केलेल्या हमीपत्रानुसार असल्याने नवरात्रौत्सावासाठीही ग्राह्य धरण्यात येत आहे.

विभाग कार्यालयांनी परंपारिक मूर्तीकारांना परवानगी द्यावी. अन्यत्र तयार केलेल्या मूर्ती निव्वळ विक्रीसाठी मंडप उभारण्याची परवानगी देवू नये, असेही आदेश देण्यात आले आहेत.(BMC Issue New Guidelines for Navratri 2020)

संबंधित बातम्या : 

Mumbai Corona | मुंबईत प्रतिबंधित इमारतींची संख्या वाढतीच, कोणत्या विभागात किती इमारती?

कुलाब्यातील ज्वेलर्सचा मराठीत बोलण्यास नकार, मराठी लेखिकेचे दुकानाबाहेर ठिय्या आंदोलन