मुंबई : मुंबई महापालिकेकडून (BMC) अनधिकृत बांधकामांसर्भात करण्यात येणाऱ्या कारवाया सातत्यानं चर्चेचा विषय ठरत आहेत. अभिनेत्री कंगणा रणौत हिच्या कार्यालयावर मुंबई महापालिकेनं केलेली तोडक कारवाई चांगलीच गाजली होती. तर, केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane ) यांच्या जुहू येथील अधीश बंगल्यासंदर्भात बीएमसीकडून नोटीस पाठवण्यात आलेल्या आहेत. मुंबई महापालिकेनं नारायण राणे यांना आतापर्यंत तीन नोटीस पाठवल्या असून 15 दिवसात अनधिकृत बांधकाम पाडण्याचे आदेश देण्यात आले आहेत. नारायण राणे यांनी बीएमसीच्या नोटीस विरोधात मुंबई हायकोर्टात धाव घेतली आहे. महापालिकेनं आता भाजप नेते मोहित कंबोज (Mohit Kamboj) यांना देखील एक नोटीस पाठवली आहे. बीएमसीनं कलम 488 नुसार ही नोटीस पाठवली आहे. त्यासंदर्भात कंबोज यांनी ट्विट करुन प्रतिक्रिया दिलेली आहे.
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यानंतर मुंबई महानगरपालिकेनी आता भाजप नेते मोहित कंबोज यांना नोटीस पाठवली आहे. मोहित कंबोज यांच्या खुशी पैराडाइज इमारतीत काही अतिरिक्त बांधकाम करण्यात आली आहे, असा पालिकेला शंका आहे.23 मार्च रोजी मुंबई महानगरपालिकेचे काही अधिकारी इमारतीचा पाहणी करण्यासाठी येणार आहे असा नोटीस मध्ये उल्लेख आहे.
कुछ झूठा केस नहीं हो पाया मेरे पे तो मेरे घर पे #BMC का नोटिस भेज दिया आज !
कंगना रनौत हो या नारायण राणे जी अगर कुछ नहीं बिगाड़ पाओं तो घर तोड़ दो !
कोई बात नहीं , यह भी सही !
कुछ भी कर लो मैं झुकूँगा नहीं तुम्हारे आगे #MahaVikasAghadi सरकार !
— Mohit Kamboj Bharatiya – मोहित कंबोज भारतीय (@mohitbharatiya_) March 21, 2022
काही महिन्यांपासून महाविकास आघाडी नेते आणि मोहित कंबोजमध्ये शाब्दिक चकमक सुरु आहे. मोहित कंबोज यांनी नोटीसची माहिती ट्विट करुन दिली. माझ्या विरोधात खोटा गुन्हा दाखल करू शकले नाहीत म्हणून मुंबई महानगरपालिकेनं माझ्या घरी नोटीस पाठवली आहे.कंगना रणौत असो किंवा नारायण राणे त्यांच्यावर कोणतीही कारवाई करु शकले नाहीत. आता घर तोडायचे काही असेल तर हरकत नाही. काहीही करा पण महाविकास आघाडी सरकारसमोर मी झुकणार नाही असंही कंबोज यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.
TV9 Marathi Poll : एमआयएमचा प्रस्ताव धुडकावून महाविकास आघाडीनं योग्य केलं का? जाणून घ्या जनतेचं मत