रस्ते आणि खड्डे दुरुस्तीवर 24 वर्षात 21 हजार कोटींची उधळण; माहितीच्या अधिकारातून मुंबई पालिकेचा पर्दाफाश

| Updated on: Jul 28, 2021 | 5:47 PM

मुंबई महापालिकेने रस्ते, अंतर रस्ते आणि खड्डे दुरुस्तीवर गेल्या 24 वर्षात 21 हजार कोटींचा खर्च केल्याची धक्कादायक माहिती उघड झाली आहे. (BMC spent Rs 21k crore on roads, Potholes in 24 years, shows RTI)

रस्ते आणि खड्डे दुरुस्तीवर 24 वर्षात 21 हजार कोटींची उधळण; माहितीच्या अधिकारातून मुंबई पालिकेचा पर्दाफाश
bmc
Follow us on

मुंबई: मुंबई महापालिकेने रस्ते, अंतर रस्ते आणि खड्डे दुरुस्तीवर गेल्या 24 वर्षात 21 हजार कोटींचा खर्च केल्याची धक्कादायक माहिती उघड झाली आहे. विशेष म्हणजे एखाद्या पालिकेच्या बजेटएवढा हा पैसा खर्च करूनही खड्डे आणि रस्त्यांची परिस्थिती जैसे थे असून दरवर्षी त्यासाठी लाखो रुपयांची तरतूद करावी लागत असल्याचं उघड झालं आहे. (BMC spent Rs 21k crore on roads, Potholes in 24 years, shows RTI)

माहितीच्या अधिकारातून ही माहिती समोर आली आहे. गेली 24 वर्षे म्हणजे 1997 पासून महापालिकेने नवे आंतररस्ते, खड्डे आणि त्यांच्या दुरुस्तीसाठी 21 हजार कोटी रुपये खर्च केले आहेत. या 24 वर्षात सर्वात जास्त खर्च 2014- 15 मध्ये झाला. या वर्षी 3201 कोटी रुपये रस्ते कामांवर खर्च करण्यात आल्याचं आढळून आलं आहे. त्याच्या पुढच्याच वर्षी म्हणजे 2015मध्ये 34 रस्ते दुरुस्तींतील घोटाळाही चांगलाच चर्चेत राहीला होता. त्यामुळे पालिका प्रशासन आणि शिवसेनेची चांगलीच कोंडी झाली होती. 2002- 03 मध्ये सर्वात कमी 80.5 कोटींचा खर्च झाला.

साटम यांची टीका

भाजप आमदार अमित साटम यांनी उपस्थित हा मुद्दा उपस्थित केला आहे. साटम यांनी माहिती अधिकारातील कागदपत्रे दाखवून ही वस्तुस्थिती समोर आणली आहे. गेली दोन तपं मुंबईनं रस्त्यावरचे खड्डे, रस्तेदुरुस्ती यांवर केलेला हा खर्च एखाद दुसऱ्या लहान शहराच्या महापालिकेचं बजेटही असू शकला असता. मात्र रस्ते आणि खड्डे दुरुस्तीवर हजारो कोटी करुनही मुंबईच्या रस्त्यांची अवस्था जैसे थेच आहे, अशी टीका साटम यांनी केली आहे.

वाझेगिरी करणारे कोण?

तुमच्या आमच्या कराचे पैसे सत्ताधाऱ्यांच्या टोळीने 21 हजार कोटी रुपये खड्ड्यात घातले. त्यामुळे मुंबई शहरात रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ते असा प्रश्न मुंबईकरांना पडलेला असतो. मुंबई हे आंतरराष्ट्रीय शहर असून आंतरराष्ट्रीय दर्जाचे रस्ते मात्र मुंबईत नाहीत. पालिकेने हे पैसे खड्ड्यात घातले आहेत. हा भ्रष्टाचार आणि वाझेगिरी करणारे कोण आहेत? हा माझा सवाल आहे, असं अमित साटम यांनी म्हटलं आहे.

साटम यांना अचानक साक्षात्कार कसा झाला?

गेल्या 24 वर्षात अमित साटमही काही वर्षे पालिकेत नगरसेवक होते. त्यांनी काढलेली माहिती कितपत खरी आहे आणि खोटी आहे हे पाहावं लागेल. त्यांच्या मते ही माहिती खरीही असेल. पण ज्यावेळी ते पालिकेत नगरसेवक होते. त्याचवेळी हा हिशोब विचारला असता तर बरं झालं असतं. आता त्यांच्या पक्षाचे लोक पालिकेत नगरसेवक म्हणून आहेत. त्यांनी आपल्या नगरसेवकांच्या माध्यमातून प्रशासनाला माहिती विचारावी. प्रशासन नक्कीच माहिती देईल. पण साटम इतकी वर्षे का थांबले हा माझ्यासमोरचा प्रश्न आहे. अचानक त्यांना असा कोणता साक्षात्कार झाला. त्यांच्या स्वप्नात कोण आलं. खड्डे आले की आणखी काय आलं हे सांगू शकत नाही. त्यांनी विधीमंडळाचं काम पाहावं. त्यांनी पालिकेची माहिती द्यावी याचा अर्थ त्यांचे नगरसेवक अकार्यक्षम आहेत, हे सिद्ध होते, असा खोचक टोला स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी साटम यांना लगावला आहे. (BMC spent Rs 21k crore on roads, Potholes in 24 years, shows RTI)

 

संबंधित बातम्या:

VIDEO : देवेंद्र फडणवीस दरडग्रस्तांच्या मांडीला मांडी लावून बसले, निवारा छावणीतच जेवले!

Photo : आमदार राजेंद्र राऊतांच्या दोन्ही मुलांचं धुमधडाक्यात लग्न; कोरोना नियमांची पायमल्ली, गुन्हा मात्र आयोजकावर!

सावधान कोरोना वाढतोय! लातूर जिल्ह्यातील माळूंब्रा गावात कोरोनाचे 20 रुग्ण, आरोग्य विभागाची चिंता वाढली

(BMC spent Rs 21k crore on roads, Potholes in 24 years, shows RTI)