मुंबई: मुंबईत गेल्या पाच दिवसांपासून कोरोनाबाधितांची संख्या वाढत चाललीय. मुंबई महापालिकेने खबरदारीचा उपाय म्हणून मिशन धारावी सुरु केले आहे. महापालिकेने दादर, माहीम ,धारावीत पुन्हा एकदा कोरोना विरोधात मोर्चेबांधणीला सुरुवात केलीय. आजपासून दहा ठिकाणी कोरोना चाचण्यांची शिबीर घेतली जाणार आहेत. ( BMC started Mission Dharavi for stop corona virus spread in Dharavi )
मुंबई महापालिकेकडून (BMC) शहरामध्ये 244 ठिकाणी मोफत कोरोना चाचणी सुरू असताना धारावी , दादर , माहीममध्ये विशेष कोरोना चाचणी शिबीर घेण्यात येणार आहेत. मोफत कोरोना चाचणी तपासणी शिबीर 23 नोव्हेंबर ते 28 नोव्हेंबरला ही घेण्यात येणार आहेत. धारावीतील कोरोना रुग्णसंख्या मुंबई महापालिकेने केलेल्या योग्य नियोजनामुळे नियंत्रणात आली होती. धारावीतील (Dharavi)कोरोना रुग्णसंख्येंवर नियंत्रण मिळवल्याबद्दल मुंबई महापालिकेचे जागतिक आरोग्य संघटनेने देखील कौतुक केले होते. आता पुन्हा रुग्ण संख्या वाढू नये यासाठी खबरदारी घेतली जात आहे.
आशिया खंडातील मोठी झोपडपट्टीत पहिल्या टप्प्यात कोरोना संख्या वाढलं होती. पण योग्य नियोजनामुळे कोरोना नियंत्रणात आला होता. मुंबई महापालिकेने पुन्हा एकदा कोरोनावर नियंत्रण ठेवण्यासाठी कंबर कसली आहे. आता पुन्हा एकदा धारावी , दादर , माहीम कोरोना वाढू नये यासाठी प्रयत्न केले जात आहेत. ( BMC started Mission Dharavi for stop corona virus spread in Dharavi )
मुंबई महापालिकेद्वारे माझं कुटुंब माझी जबाबदारी ही मोहीम मोठ्या प्रमाणात राबवली जात आहे. या दरम्यान नागरिकांची आरोग्य तापसणी, कोरोना चाचण्या सातत्याने केल्या जात आहेत. लोकांच्या संपर्कात येणाऱ्या दुकानदार , फेरीवाले , हॉटेल कर्मचारी , फुल मार्केट व्यापारी यांच्या कोरोना टेस्ट केल्या जात आहेत.
कोरोनाच्या सर्व समूह तपासण्या, चाचणी शिबीरांचे आयोजन, पालिकेचे दवाखाने येथे टेस्ट घेतल्या जात आहेत. कोरोनाची दुसरी लाट आली तर कोविड सेंटर सज्ज आहेत. नागरिकांनी मास्क घालावेत यासाठी प्रबोधन केल जात आहे , मास्क न घालणाऱ्या लोकांवर दंड लावला जात आहे. मंदिर आणि धार्मिक स्थळं खुली झाल्यावर गर्दी होत आहे. त्यामुळे मंदिर आणि धार्मिक स्थळांमधील पुजाऱ्यांच्या ही टेस्ट केल्या जाणार आहेत, अशी माहिती मुंबई महापालिकेचे सहायक आयुक्त किरण दिघावकर यांनी दिली.
मुंबईत कोरोना रुग्णसंख्येत पुन्हा हळूहळू वाढ
16 नोव्हेंबर : 409
17 नोव्हेंबर : 541
18 नोव्हेंबर : 871
19 नोव्हेंबर : 924
20 नोव्हेंबर : 1031
21 नोव्हेंबर : 1092
कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे राज्यात पुन्हा कडक निर्बंध लादले जाणार?, विजय वडेट्टीवार यांचे संकेत https://t.co/AKDlEc0MtL @VijayWadettiwar @CMOMaharashtra @OfficeofUT #coronavirus
— TV9 Marathi (@TV9Marathi) November 23, 2020
संबंधित बातम्या:
Mumbai Corona | मुंबईत कोरोनाचा चढता क्रम, पाच दिवसात रुग्णांची संख्या दुप्पट
Mumbai Local | मुंबईत कोरोना वाढला, सर्वसामान्यांसाठी लोकल सेवा सुरू करण्याचा निर्णय लांबणीवर
( BMC started Mission Dharavi for stop corona virus spread in Dharavi )