मुंबई : कोव्हिडच्या काळात महापालिकेच्या डॉक्टरांसह इतर कर्मचाऱ्यांना राहण्यासाठी (BMC Use Hotels) तसेच कोव्हिडबाधित रुग्णांच्या संपर्कातील लोकांना विलगीकरण केंद्रात ठेवण्यासाठी महापालिकेने हॉटेलच्या जागा ताब्यात घेतल्या. सर्व तारांकित आणि बिगर तारांकित अशा एकूण 182 हॉटेलचा वापर महापालिकेने करुन त्यांचे पैसे अदा केले आहेत (BMC Use Hotels).
हॉटेलच्या वापराचे पैसे मालकांना दिल्यानंतर त्यांना त्या कालावधीतील मालमत्ता कराच्या वापरात सवलत देण्याचा निर्णय प्रशासन घेण्याच्या विचारात आहे. त्यामुळे महापालिका हॉटेल्सना कोरोना बोनस देऊ शकते.
एप्रिल ते जून या कालावधीत हॉटेलच्या मालमत्ता कराचे पैसे वापरकर्ते म्हणून महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून वसूल केले जाणार आहेत. हॉटेल व्यावसायिकांवर मेहेरबान झालेल्या आयुक्तांनी ही सवलत देण्यासाठी आपल्याच तिजोरीत हात घालत आरोग्य विभागाच्या खात्यातून करनिर्धारण आणि संकलन विभागाकडे या कराची रक्कम वळती करुन घेण्याचा निर्णय घेतला आहे.
एप्रिल ते जून 2020 या तीन महिन्याच्या कालावधीत या सर्व हॉटेलची मालमत्ता कराची रक्कम 22 कोटी 70 लाख रुपये एवढी आहे. त्यामुळे हॉटेल व्यावसायिक मालमत्ता कराची जी रक्कम महापालिकेला भरणे अपेक्षित आहे. ती रक्कम महापालिका स्वतःच भरणार आहे.
हॉटेलचा वापर आरोग्य विभागाने केला. त्यामुळे ज्या ज्या हॉटेलमध्ये रुमसाठी जेवढा दर आहे, त्या रुमच्या वापराप्रमाणे आरोग्य विभागाच्यावतीने प्रत्येक हॉटेलच्या मालकांना अथवा व्यवस्थापनाला तो दर दिला आहे.
मुंबईत झोपडपट्ट्या-चाळींपेक्षा कोरोनाचा बिल्डिंगमध्येच जास्त फैलाव, बीएमसीसमोर मोठं आव्हानhttps://t.co/Yr9mBEdi68#Mumbai #Corona
— TV9 Marathi (@TV9Marathi) September 15, 2020
BMC Use Hotels
संबंधित बातम्या :
बीएमसीच्या ‘माझे कुटुंब-माझी जबाबदारी’ मोहिमेत सहभागी व्हा, सिनेकलाकार, साहित्यिकांचं आवाहन
कोरोनाच्या काळात बंद उद्यानांवर मुंबई महापालिकेची 22 कोटींची उधळपट्टी