मुंबई : नागरिकत्व दुरुस्ती कायद्याला विरोध करणाऱ्या जामिया विद्यापीठातील विद्यार्थ्यांवरील पोलिस कारवाईचे पडसाद देशभरात उमटत आहेत (Bollywood actors on violence against students). यात बॉलिवूडचाही समावेश आहे. पोलिसांनी निशस्त्र विद्यार्थ्यांवर हिंसक कारवाई केल्याचा आरोप करत अनेकजण विद्यार्थ्यांच्या बाजूने उभे राहिले आहेत. बॉलिवूडमधील अनेक दिग्गजांनी विद्यार्थ्यांच्या मारहाणीचा निषेध करत त्यांना आपला विरोध दाखवण्याचा अधिकार असल्याचं स्पष्ट मत व्यक्त केलं (Bollywood actors on violence against students).
विद्यार्थ्यांनी कायद्याला विरोध केला म्हणून पोलिसांनी विद्यार्थ्यांवर अशाप्रकारे बळाचा वापर करणं अत्यंत निंदनीय असल्याचं मत या बॉलिवूड कलाकारांनी व्यक्त केलं आहे.
आयुष्मान खुराणाने ट्विट केलं, “विद्यार्थ्यांसोबत जे घडलं त्याने खूप अस्वस्थ आहे. ते निंदनीय आहे. आपल्या सर्वांना विरोध प्रदर्शन करण्याचा अधिकार आहे. या विरोध प्रदर्शनांनंतर हिंसक घटना न होणं आणि सार्वजनिक मालमत्तेचं नुकसान न होणं हेही महत्त्वाचं आहे. माझ्या देशवासियांनो हा गांधींचा देश आहे. अहिंसा हेच आपलं हत्यार असलं पाहिजे. लोकशाहीत विश्वास ठेवला पाहिजे.”
This!?? ?? pic.twitter.com/X8qj9sCdEO
— Ayushmann Khurrana (@ayushmannk) December 16, 2019
आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवरील हिंसेचा बॉलिवूड अभिनेते मनोज वाजपेयी यांनी देखील निषेध केला. मनोज वाजपेयी म्हणाले, “अन्यायाला रोखण्यासाठी आपल्याकडे शक्ती नाही अशा वेळ येऊ शकते. मात्र, विरोधही करता येणार नाही, अशी स्थिती तयार होता कामा नये. मी विद्यार्थ्यांच्या विरोध करण्याच्या लोकशाही हक्कांसोबत आहे. आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांसोबत झालेल्या हिंसेचा मी निषेध करतो.”
There may be times when we are powerless to prevent injustice, but there must never be a time when we fail to protest.
With the students and their democratic rights to protest ! I condemn violence against protesting students!!!!!— manoj bajpayee (@BajpayeeManoj) December 16, 2019
जर एखादा नागरिक विरोध करत आपले विचार मांडत असेल आणि त्याला हे सर्व सहन करावे लागत असेल, तर कॅब (CAB) सोडा. आपल्याला फक्त विधेयकं पारित करत राहायला हवं आणि देशाला लोकशाही म्हणणं सोडून द्यायला हवं. आपली विरोधी मतं मांडणाऱ्यांना अशी मारहाण करणं ही हिंस्र कृती आहे, असं मत बॉलिवूड अभिनेत्री परिनीती चोप्राने व्यक्त केलं.
If this is what’s gonna happen everytime a citizen expresses their view, forget #CAB, we should pass a bill and not call our country a democracy anymore! Beating up innocent human beings for speaking their mind? BARBARIC.
— Parineeti Chopra (@ParineetiChopra) December 17, 2019
सर्जिकल स्ट्राईक सारख्या देशभक्तीपर चित्रपटाने अनेकांच्या गळ्यातील ताईत झालेल्या विकी कौशलने देखील स्पष्ट भूमिका घेतली आहे. विकी कौशल म्हणाला, “जे काही होत आहे आणि ज्या पद्धतीने होत आहे ते अजिबात योग्य नाही. शांततापूर्ण मार्गाने आपलं म्हणणं मांडण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे. हिंसा आणि गोंधळ दोन्ही गोष्टी निराशपूर्ण आहेत. कोणत्याही प्रकारे नागरिकांचा लोकशाहीवरुन विश्वास उडायला नको.”
What is happening is not okay. The way it’s happening is not okay. People have every right to peacefully voice their opinion. This violence and disruption is both saddening and concerning as a fellow citizen. In no circumstance, must our faith in democracy be shaken. ??
— Vicky Kaushal (@vickykaushal09) December 16, 2019
दिग्दर्शक अनुभव सिन्हा म्हणाले, “जेव्हा दिल्लीत वकिलांनी पोलिसांना मारहाण केली, तेव्हा मी पोलिसांच्या पाठिंब्यासाठी उभा राहिलो.”
विशेष म्हणजे अनुभव सिन्हा यांनी बिग बी अमिताभ बच्चन यांच्यावरही निशाणा साधला. विद्यार्थ्यांवर हिंसक कारवाई होऊनही बच्चन यांनी अद्यापही आपली प्रतिक्रिया दिलेली नाही. यालाच लक्ष्य करत सिन्हा यांनी 2012 मधील त्यांचं एक ट्विट रिट्विट करत सर बोलले, आनंद झाला, असं उपरोधिकपणे म्हटलं.
So happy Sir spoke….:-) https://t.co/BYs6P8Chlf
— Anubhav Sinha (@anubhavsinha) December 17, 2019
ज्येष्ठ अभिनेत्री रेणुका शहाणे यांनी पंतप्रधान मोदींच्या ट्विटला रिट्विट करत भाजपच्या आयटी सेलवरच निशाणा साधला आहे. पंतप्रधान मोदी यांनी ट्विट केलं, की “ही शांतता, बंधुता आणि एकता ठेवण्याची वेळ आहे. मी सर्वांना अफवांपासून दूर राहण्याचं आवाहन करतो.”
Sir, please ask people to stay away from all your IT cell Twitter handles then. They spread the most amount of rumours, falsehoods and are totally against brotherhood, peace and unity. The real.”tukde tukde” gang is your IT cell sir. Please stop them from spreading hate ???? https://t.co/bMaXDFnvsP
— Renuka Shahane (@renukash) December 16, 2019
यावर रेणुका शहाणे यांनी म्हटलं, “सर, मग तुम्ही लोकांना तुमच्या सर्व आयटी सेलच्या ट्विटर हँडलपासूनही दूर राहण्यास सांगा. हे आयटी सेलच सर्वाधिक अफवा पसरवतात आणि ते बंधुत्वाच्या, शांततेच्या आणि एकतेच्या विरोधात आहेत. खरी तुकडे तुकडे गँग तुमची आयटी सेलच आहे. कृपया त्यांना द्वेष पसरवण्यापासून रोखा.”