सलमान खान गोळीबार प्रकरणात मोठी अपडेट, मुंबई पोलिसांनी नोंदवला जबाब

| Updated on: Jun 12, 2024 | 5:25 PM

Salman Khan Firing Case : बॉलिवुडमधील भाईजान सलमान खान याच्या घरावर एप्रिल महिन्यात गोळीबार झाल्याची घटना समोर आली होती. या प्रकरणाबाबत सलमान खान याने गुन्हे शाखेकडे आपला जबाब नोंदवला आहे. सलमाना नेमका काय जबाब नोंदवला? पोलिसांनी काही तपासामध्ये त्याचा फायदा होणार की नाही हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

सलमान खान गोळीबार प्रकरणात मोठी अपडेट, मुंबई पोलिसांनी नोंदवला जबाब
Follow us on

बॉलिवुडचा दबंग अभिनेता सलमान खान याच्या घरावर 14 एप्रिलला गोळीबार झाला होता. हा गोळीबार बिश्नोई गँगने केल्याचं समोर आलं होतं. या गोळीबार प्रकरणाचा तपास मुंबई गुन्हे शाखेकडून करण्यात येत असून अशातच या प्रकरणासंदर्भात एक मोठी अपडेट समोर आली आहे. सलमानच्या गॅलेक्सी अपार्टमेंटवरील गोळीबार प्रकरणी सलमान खान याचा जबाब नोंदवला आहे. 4 जूनला मुंबई पोलिसांनी हा जबाब नोंदवला, बिश्नोई गँगने सलमान खानच्या घरावर गोळीबार केला होता.

नेमकं काय आहे प्रकरण?

अभिनेता सलमान खान याच्या मुंबईमधील वांद्रे येथील घरावर १४ एप्रिल रोजी पहाटे हा गोळीबार झाला होता. या घटनेमुळे खळबळ उडाली होती, अनेक दिवसांपासून सलमान हा बिश्नोई गँगच्या रडारवर आहे. गोळीबार प्रकरणामध्ये पोलिसांनी दोन आरोपींना ताब्यात घेतलं होतं. सागर पाल आणि विकी गुप्ता अशी आरोपींची नावे आहेत. या प्रकरणामध्ये सलमानच्या घरावर गोळीबार करण्यासाठी बंदुक देणाऱ्या आरोपींनाही पोलिसांनी पकडलं होतं. अनुज कुमार थापन आणि सोनू चंदर अशी त्यांची नावे आहेत. मात्र यामधील आरोपी अनुज थापन याने १ मेला तुरूंगामध्येच आत्महत्या केल्याचं समोर आलं होतं.

सलमान खानने काय जबाब नोंदवला?

अभिनेता सलमान खान याने  ४ जूनला पोलिसांकडे जबाब नोंदवला आहे. आता सलमान खानने नोंदवलेल्या जबाबामधून काही महत्त्वाचा पुरावा किंवा काही नवीन लागते की जी या गोळीबार प्रकरण तपासासाठी महत्त्वाची ठरेल याकडे आता सर्वांचं लक्ष लागलं आहे.

दरम्यान, सलमान खान याला धमकी दिल्याचे मेल किंवा काही पक्ष अनेकदा मिळाले आहेत. सलमान खानचे वडील सलीम खान ज्या ठिकाणी मॉर्निंग वॉकला जात होते त्या ठिकाणीच त्यांच्या सुरक्षारक्षकाला सापडलं होतं. सलमानसाठी आता सुरक्षा व्यवस्था आणखी वाढवण्यात आली आहे.