[svt-event title=”डोंबिवलीच्या ममता हॉस्पिटलमध्ये तोडफोड” date=”06/03/2020,9:28AM” class=”svt-cd-green” ] डोंबिवली पूर्वेतील मिलापनगर परिसरात ममता हॉस्पिटलमध्ये तोडफोड केल्याची घटना समोर आली आहे. तोडफोड करणारा व्यक्ती कोण आहे? त्याने तोडफोड का केली आहे? याचा तपास मानपाडा पोलीस करत आहे. या संपूर्ण प्रकरणावर हॉस्पिटल प्रशासन काहीही बोलण्यास तयार नाही. हॉस्पिटलमध्ये एका तरुणाला उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान त्या तरुणाच्या मृत्यूनंतर त्याच्या नातेवाईकांनी ही तोडफोड केली असल्याची सूत्रांची माहिती आहे. [/svt-event]
[svt-event title=”धावत्या आयशर ट्रकला आग, जीवितहानी नाही” date=”06/03/2020,9:19AM” class=”svt-cd-green” ] बलडाणा जिल्ह्यातील सुलतानपूर येथून जात असलेल्या आयशर ट्रकने आचानक पेट घेतला. त्यामुळे एकच खळबळ उडाली. आग लागताच चालकाने सुलतानपूर येथील वेदांत आश्रममागील खुल्या जागेत ट्रक थांबवला. सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी नाही. स्थानिकांनी पाणी टाकून ट्रकची आग विझवली. [/svt-event]
[svt-event title=”साताऱ्यात खंबाटकी बोगद्याजवळ अपघात, तिघांचा मृत्यू” date=”06/03/2020,9:13AM” class=”svt-cd-green” ] साताऱ्यात खंबाटकी बोगद्याजवळ एस वळणावर बओरवेल गाडी पलटी, या भीषण अपघातात तिघांचा मृत्यू तर 8 जण जखमी आहेत. जखमींवर खंडाळा येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरु [/svt-event]
[svt-event title=”नंदुरबार शहरात अवकाळी पाऊस” date=”06/03/2020,9:11AM” class=”svt-cd-green” ] नंदुरबार शहर आणि परिसरात आवकळी पावसाची हजेरी, पाच ते दहा मिनिटं मध्यम स्वरूपाचा पाऊस, मिरची व्यापारी आणि शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची भीती [/svt-event]