मुंबई: छत्रपती शिवाजी महाराज स्टेशनबाहेरील पादचारी ब्रिजचा स्लब कोसळून 5 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 34 जण जखमी आहेत. त्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची भीती आहे. अंजुमन इस्लाम शाळेजवळील हा ब्रिज आहे. या ब्रिजच्या पादचारी पुलाचा स्लॅब कोसळून ही दुर्घटना घडली. जखमींना सेंट जॉर्ज रुग्णालयात दाखल करण्यात आलंय.
Pained to hear about the FOB incident near TOI building in Mumbai.
Spoke to BMC Commissioner and @MumbaiPolice officials and instructed to ensure speedy relief efforts in coordination with @RailMinIndia officials.— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) March 14, 2019
मृतांची नावे
अपूर्वा प्रभू (35)
रंजना तांबे (40)
झहीद खान (32)
भक्ती शिंदे (40)
तपेंद्र सिंग (35)
पुलाचा स्लॅब कोसळल्यानंतर घटनास्थळी एकच धावाधावा झाली. संध्याकाळच्या वेळी सर्वजण ऑफिसवरुन घरी जाण्यासाठी निघत असतात. त्याचवेळी ही दुर्घटना घडल्याने एकच खळबळ उडाली. धक्कादायक म्हणजे या पुलाखालून नेहमी वाहनांची रहदारी सुरु असते. प्रत्यक्षदर्शींच्या माहितीनुसार, पुलावरुन चालत असलेले लोकही खाली कोसळले, शिवाय खालीही अनेक जण उपस्थित होते. अधिकृतपणे दोन महिलांचा मृत्यू झाल्याची माहिती देण्यात आली आहे. पण प्रत्यक्षदर्शीच्या मते, किमान पाच जण असे होते, ज्यांचा जागीच मृत्यू झाला होता.
सीएसएमटी रेल्वे स्थानक परिसरात पादचारी पूल कोसळल्याची घटना अत्यंत दुर्दैवी आहे. या दुर्घटनेत जीवितहानी झाल्याचं वृत्त अतिशय दुःखद आहे. जखमींच्या प्रकृतीत लवकर सुधारणा होईल, अशी प्रार्थना करतो. या दुर्घटनेमुळे मुंबईतील पुलांचा दर्जा आणि त्यांच्या दुरुस्तीचा प्रश्न उपस्थित होत आहे.
— Ajit Pawar (@AjitPawarSpeaks) March 14, 2019
सायंकाळी सीएसएमटी स्टेशनला प्रचंड गर्दी असते. चाकरमानी दिवसभर काम करुन घराकडे निघालेली असतात. याच गर्दीच्या वेळी ही दुर्घटना घडली. मुंबई महापालिका मुख्यालयापासून हाकेच्या अंतरावर हा पूल आहे.
Deeply anguished by the loss of lives due to the foot overbridge accident in Mumbai. My thoughts are with the bereaved families. Wishing that the injured recover at the earliest. The Maharashtra Government is providing all possible assistance to those affected.
— Narendra Modi (@narendramodi) March 14, 2019
पाहा व्हिडीओ
EXCLUSIVE – सीएसएमटीजवळ पादचारी पूल कोसळला #CSMT #footoverbridge #CST pic.twitter.com/AakECUImpI
— TV9 Marathi (@TV9Marathi) March 14, 2019