वसई: वसईच्या बंगली बाभोला (Vasai Bangali Babhola) परिसरातील दलविंदर शेठी (Dalvindar Shethi) या बिल्डरची दादागिरी समोर आली आहे. इमारतीचे बांधकाम सुरू असताना बिल्डिंग मटेरिअलचे ट्रक रस्त्यावर आडवे करून, रस्ता बंद करणे, जाब विचारला तर राहिवाशाला मारहाण (Beating) करून, एका रहिवाशी महिलेचा विनयभंग केला असल्याची धक्कादायक घटना आता उघड झाली आहे. याबाबत दलविंदर शेठी याच्या विरोधात वसई पोलीस ठाण्यात विनयभंग, मारहाण, रस्ता अडविणे, जीवे मारण्याची धमकी देणे यासह विविध कलमन्वये गुन्हा दाखल झाला असून, बिल्डर फरार झाला आहे.
वसई बंगाली बाभोला परिसरात दलविंदर शेठी या बिल्डरची क्लासिक हाईट्स या इमारतीचे बांधकाम सुरू आहे. याच इमारतीच्या बाजूला क्लासिक रेसिडेन्सी ही इमारत आहे. या इमारतीतील राहिवाशांना जाण्याचा येण्यासाठी असणाऱ्या रस्त्याच्या कडेलाच दलविंदर शेठी यांच्या इमारतीचे काम सुरू आहे. या इमारतीचे बांधकाम मटेरियल मिक्स करणारे ट्रक रस्त्यावरच उभे करून, नागरिकांचा रस्ता बंद केला जात आहे.
13 मे रोजी दुपारी 4 च्या सुमारास बाजूच्या इमारतीतील 34 वर्षीय महिला आपल्या मुलीला घेऊन रुग्णालयात जात असताना, त्यांच्या रस्त्यावर ट्रक आडवा आला असल्याने त्यांनी ट्रक बाजूला घेण्यास सांगितले असता झालेल्या वादावादित बिल्डर दलविंदर शेठी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी 34 वर्षीय महिला व तिच्या पतीला मारहाण करून, महिलेचा विनयभंग केला असल्याचा आरोप करीत वसई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
या प्रकरणात बिल्डर दलविंदर शेठी हा मात्र फरार झाला आहे. पण या आरोपीला लवकर पकडून राहिवाशाना न्याय देण्याची मागणी केली जात आहे.
या बिल्डरकडून महिलेचाही विनयभंग करण्यात आला असल्याने तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. रहिवाशांनाही दादागिरीची भाषा वापरत असल्याने सामान्य नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. त्यामुळे दादागिरी करणाऱ्या या बिल्डरला तात्काळ अटक करावी अशी मागणी केली जात आहे.