एनसीपीचे नेते बाबा सिद्दीकी यांची हत्या ज्या बुलेटप्रुफ कारच्या काचांना भेदून झाल्याने ज्या पिस्तुलाने ही हत्या झाली त्या पिस्तुलाची चर्चा सुरु झाली आहे. बाबा सिद्दीकी यांची हत्या 9.9 मिमी पिस्तुलातून झाल्याचे निष्पन्न झाले आहे. या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या मारेकऱ्यांकडून 9.9 एमएमचे पिस्तूल आणि 28 जीवंत काडतूसं जप्त करण्यात आलेली आहे. बाबा सिद्दीकी यांच्या हत्येची जबाबदारी लॉरेन्स बिष्णोई या उत्तर भारतातील कुख्यात गॅंगने सोशल मिडीयावरुन घेतलेली आहे. पोलिस या संदर्भात तपास करीत आहेत.
कॉंग्रेसमधून राष्ट्रवादी अजितदादा गटात आलेले बाबा सिद्दीकी यांची मारेकऱ्यांनी अंधाधुंद गोळीबार करीत त्यांच्या मुलाच्या वांद्रे खेरवाडी येथील कार्यालयासमोरच हत्या केली होती. त्यावेळी ते कारमध्ये बसत असतानाच त्यांच्या अत्यंत जवळून गोळीबार करण्यात आला होता. त्यांच्या बुलेट प्रुफ कारची विण्डशील्ड गोळीने भेदत त्यांचा बळी घेतल्याचे पुढे आले आहे. वास्तविक ज्या 9.9 मिमी पिस्तुलातून बाबा सिद्दीकी यांची हत्या झाली ते पिस्तुल सेमी ऑटोमेटिक पिस्तुल आहे. या पिस्तुलाची निर्मिती मुख्यत: सैनिकांच्या तसेच पोलिसांच्या गरजांसाठी करण्यात आली होती.तशाच प्रकारे पिस्तुलाचे डीझाईन केलेले होते.हे पिस्तुल त्याच्या प्रभावी कार्यक्षमतेबाबत कुख्यात आहे.
साल 1990 च्या दशकात सक्रीय गॅंगस्टर श्रीप्रकाश शुल्क याने या पिस्तुलावर AK-47 पेक्षा जास्त भरोसा केला होता. तो नेहमी आपल्या सोबत अशा एक दोन पिस्तुल ठेवायचा.याच हत्याराचा वापर सिद्दीकी यांना गोळ्या घालण्यासाठी करण्यात आला.ज्याच्या गोळ्या बुलेट प्रुफ कारच्या काचांना भेदून बाबा सिद्दीकी यांच्यापर्यंत पोहचल्या आणि एका क्षणात त्यांचा मृत्यू झाल्याचे उघडकीस आले आहे.
भारतात 9.9 मिमीच्या पिस्तुलाची सुरुवात 1981 मध्ये झाली. जॉन इंगलिस एंड कंपनीच्या सहकार्याने पश्चिम बंगालच्या इशापुर ऑर्डिनेंस फॅक्ट्रीत हीला विकसित केले गेले. दंगल किंवा चकमकी सारख्या परिस्थितीला हाताळण्यासाठी या पिस्तुलाचे डिझाईन केले गेले. ही पिस्तुल तिच्या अचूकतेसाठी ओळखली जाते. तीन यार्ड ते 50 यार्डाचं अंतरावरचे लक्ष्य सहज टार्गेट करता येते. हीचे खास वैशिष्ट्ये म्हणजे हीची कमी रिकॉईल आहे.ज्यामुळे फायरिंग करताना आपल्या ती हलू देत नाही.त्यामुळे उपयोगकर्ता एकावेळी दोन पिस्तुलं देखील फायर करु शकतो. एका मॅगझीनमध्ये 13 राऊंड असतात. ज्यास एक एक करुन किंवा लागोपाठ फायर करण्याची सुविधा आहे. या पिस्तुलाची खुबी म्हणजे हीची सुरक्षितता आहे. कारण जेव्हा हीचा ट्रीगर लॉक बंद केले असेल तर पिस्तुल पडले तरी फायर होत नाही. त्यामुळे ही अत्यंत सुरक्षित असते. सिद्दीकी प्रकरणात त्यामुळे ही पिस्तुल मारेकऱ्यांनी वापरली असावी असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.