19 जुलै रोजी मायक्रोसॉफ्टचा सर्व्हर डाऊन झाल्याचा फटका संपूर्ण जगाला बसला संपूर्ण जगातील विमान सेवेवर याचा खासा परिणाम झाला. अनेक विमानांच्या उड्डाणांना त्याचा फटका बसला. अनेक एअरलाईन सर्व्हीस आणि एअरपोर्ट या सर्व्हर बिघाडाने ठप्प झाले. भारतीय विमान कंपन्यांनी आपली 200 हून अधिक उड्डाणे रद्द केली. एकट्या इंडिगोने आतापर्यंत 192 विमान उड्डाणे रद्द केले आहेत. आता एक प्रश्न सर्वसामान्याच्या मनात आहे की जर अशा प्रकारचा सर्व्हर डाऊन झाला तर आकाशात त्यावेळी उडत असलेल्या विमानांची टक्कर होऊ शकते. तर चला पाहूयात अशा वेळे नेमके काय होते ते ?
मायक्रोसॉफ्टचा सर्व्हर डाऊन झाल्याने हवेत उडणाऱ्या विमानांची टक्कर होऊ शकते का ? असे तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही चुकीचे आहात.कारण एअरलाइन्स कंपन्यांकडे बॅकअप सर्व्हर असतात. मुख्य सर्व्हरने काम करणे थांबवताच हे बॅकअप आपोआप सक्रिय होतात आणि सेवा सुरळीतपणे चालू राहण्यात मदत करतात. परंतू, बॅकअप सर्व्हरमुळे काम थोडे संथगतीने होते हे खरे आहे. म्हणूनच काल तुम्ही पाहिले असेल की अनेक विमान कंपन्यांचे कर्मचारी बोर्डिंग पासवर हाताने लिहीत आहेत.
जेव्हा संगणकाचा सर्व्हर डाउन होतो, तेव्हा अशा परिस्थितीत विमान कंपन्या आपत्कालीन संपर्क नेटवर्क यंत्रणेचा वापरतात. नेटवर्क आऊटेजच्या सारख्या घटनांच्यावेळी आपत्कालीन संपर्क नेटवर्क हवेत उडणारी विमाने आणि नियंत्रण कक्ष यांच्यात संवाद स्थापित करण्यास मदत करते. त्यामुळेच सर्व्हर डाऊन झाल्यानंतरही विमाने हवेत सहज उडू शकतात.
19 जुलै रोजी मायक्रोसॉफ्टचा सर्व्हर डाऊन तेव्हा संपूर्ण जगातील विमान तळावर गोंधळ उडाला. उड्डाणे आणि विमानाच्या बोर्डिंग पासाची कामे रखडली. यावेळी विमानतळावर कंपन्याना विमानाचे ट्रॅफीक इमर्जन्सी कम्यूनिकेशन नेटवर्कचा वापर करते. ते देखील खराब झाले तर एअर ट्रॅफीक कंट्रोल रुममधील रेडीओ कम्युनिकेशनचा आधार करते. एअरलाईन कंपन्या अशा वेळी एका खास प्रकारच्या रेडीओ फ्रिक्वेन्सीचा आधार करते. त्याचा वापर करुन आकाशात उडणाऱ्या विमानांचे नियमन केले जाते.