मुंबई : हिंदुस्थानी भाऊ ऊर्फ विकास पाठकविरोधात (Vikas Pathak) धारावी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. तसेच पोलीस हिंदुस्तानी भाऊला बांद्रा कोर्टात हजर करण्याची शक्यता आहे. ऑफलाईन परीक्षेच्या मागणीला घेऊन 31 जानेवारी रोजी हजारो विद्यार्थी धारावीमध्ये रस्त्यावर उतरले. यावेळी विद्यार्थ्यांनी शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड (Varsha Gaikwad) यांच्या घराला घेराव घातला. प्रसिद्ध सोशल मीडिया स्टार हिंदुस्तानी भाऊ याच्या आवाहनानंतरच विद्यार्थ्यांनी (Student) धारावीमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी केली, असा आरोप केला जातोय. त्यानंतर आता पोलिसांनी हिंदुस्तानी भाऊवर कायदेशीर कारवाई करण्याचा निर्णय घेतलाय.
युट्युबर विकास फाटक उर्फ हिंदुस्तानी भाऊ यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. धारावी पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस हिंदुस्तानी भाऊला बांद्रा कोर्टात हजर करण्याती शक्यात आहे. 31 जानेवारी रोजी धारावी नाईंटी फिट रोडवर विद्यार्थ्यांनी ऑफलाईन परीक्षेच्या निषेधार्थ रस्त्यावर मोठे आंदोलन केले. विद्यार्थ्यांच्या या गोंधळामुळे येथे काही काळासाठी तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. पोलिसांना विद्यार्थ्यांना पांगवण्यासाठी लाठीचार्ज करावा लागला होता. तर दुसरीकडे विद्यार्थ्यांनी परीक्षा ऑनलाईन व्हाव्यात म्हणून धारावी परिसर दणाणून सोडला होता. त्यानंतर आता धारावीमध्ये जो विद्यार्थ्यांचा गोंधळ झाला त्या संदर्भात गुन्हा दाखल करण्यात आला. विकास फाटक उर्फ हिंदुस्थानी भाऊ हा या प्रकरणात मुख्य आरोपी असून त्याला आणि इतर काही लोकांना आरोपी बनवण्यात आलं आहे.
पाहा व्हिडीओ :
ही कारवाई केल्यानंतर सोशल मीडियाद्वारे चिथावणीखोर वक्तव्ये करण्यात आली होती, त्यामुळे हा गुन्हा दाखल करण्यात आलाय, अशी माहिती पोलिसांनी दिली. तसेच पोलिसांनी सोशल मीडियाचा योग्य पद्धतीने वापर करण्याचं आवाहन लोकांना केलं आहे. दरम्यान, पोलिसांच्या या कारवाईनंतर विद्यार्थी काय भूमिका घेणार हे पाहणे आता महत्त्वाचे ठरणार आहे.
इतर बातम्या :