पुन्हा पैशांचं घबाड, विरार आणि नालासोपाऱ्यात कोट्यवधी रुपयांच्या रकमेसह 2 संशयास्पद व्हॅन सापडल्या, तपासाला वेग

| Updated on: Nov 07, 2024 | 5:37 PM

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पालघरमध्ये पोलिसांनी दोन एटीएम व्हॅन ताब्यात घेतल्या आहेत, ज्यात कोट्यवधी रुपये सापडले आहेत. हे पैसे एटीएमचे असल्याचा दावा असला तरी, त्यांचा हिशोब न मिळाल्याने पोलिसांना निवडणुकीत पैशांचा गैरवापर झाला असण्याचा संशय आहे. नलसोपारा आणि विरारमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी ही कारवाई करण्यात आली असून, या प्रकरणाची सखोल चौकशी सुरू आहे.

पुन्हा पैशांचं घबाड, विरार आणि नालासोपाऱ्यात कोट्यवधी रुपयांच्या रकमेसह 2 संशयास्पद व्हॅन सापडल्या, तपासाला वेग
विरार आणि नालासोपाऱ्यात कोट्यवधी रुपयांच्या रकमेसह 2 संशयास्पद व्हॅन सापडल्या
Follow us on

विधानसभा निवडणुकीचं बिगूल वाजलेलं आहे. मतदान आता अवघ्या 13 दिवसांवर येऊन ठेपलं आहे. असं असताना आदर्श आचारसंहितेचं पालन व्हावं यासाठी प्रशासन दिवसरात्र काम करत आहे. याच कामातून राज्यभरातून वेगवेगळ्या कायदेशीर कारवायांची माहिती समोर येत आहे. पोलीस, अँटीकरप्शन डिपार्टमेंट तसेच विविध यंत्रणांकडून राज्यभरात ठिकठिकाणी वाहनांची तपासणी केली जात आहे. मतदानाच्या आधी मतदारांना पैशांचं आमिष देवून आचारसंहितेचा भंग होऊ नये यासाठी प्रशासनाकडून प्रचंड प्रयत्न केले जात आहेत. याच जबाबदारीतून आतापर्यंत कोट्यवधी रुपये जप्त करण्यात आले आहेत. पोलिसांनी वेगवेगळ्या जिल्ह्यांमधून कोट्यवधीची रक्कम जप्त केली आहे. विशेष म्हणजे पालघरमधून मोठी बातमी समोर येत आहे.

पालघरमध्ये पोलिसांनी दोन संशयित व्हॅन ताब्यात घेतल्या आहेत. या व्हॅनमध्ये कोट्यवधी रुपये कॅश आहेत. संबंधित गाडी ही एटीएमच्या गाडी आहेत. त्यामुळे त्याच पैसे असणे साहजिकच आहे. पण या गाडींमधील पैशांचा हिशोब लागत नसल्याने पोलिसांचा संशय बळावला आहे. निवडणुकीत पैशांचं वाटप करण्यासाठी राजकारणी आता थेट एटीएमच्या गाड्यांचा वापर करत आहेत का? असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतोय. अर्थात या प्रकरणी पोलिसांच्या तपासात काय-काय समोर येतं ते पाहणं महत्त्वाचं ठरेल.

नेमकं प्रकरण काय?

नालासोपारा विधानसभेत विरार आणि नालासोपारा या दोन ठिकाणी करोडो रुपयांची रक्कम घेवून जाणाऱ्या दोन व्हॅन संशयास्पद भरारी पथकाने पकडल्या आहेत. पकडलेल्या दोन्ही व्हॅन या एकाच CMS connecting commerce या कंपनीच्या आहेत. या व्हॅन ATM ची रक्कम घेवून जाणाऱ्या आहेत. असं असलं तरी पोलिसांना गाडीमधील पैशांवरुन वेगळाच संशय आहे.

हे सुद्धा वाचा

नालासोपारामधील व्हॅनमध्ये 3 कोटी 50 लाख तर विरारच्या मांडवी याठिकाणी पकडलेल्या व्हॅनमध्ये 2 कोटी 80 लाख एवढी रक्कम पोलिसांनी ताब्यात घेतली आहे. पोलिसांनी या दोन्ही एटीएम व्हॅन नालासोपारा आणि मांडवी पोलीस ठाण्यात नेवून चौकशी सुरु केली आहे. एटीएमच्या गाडीतील रकमेचा हिशोब मिळत नसल्याने पोलिसांकडून पैसे एटीएम की निवडणुकीच्या वापरासाठी आले आहेत? याची चौकशी सुरू आहे.