मुंबई विद्यापीठात गुरांचा वर्ग, कलिना कॅम्पसमधील टेनिस कोर्टात गुरं चरायला

| Updated on: Jan 30, 2021 | 10:13 AM

जारो विद्यार्थ्यांना घडवणाऱ्या या मुंबई विद्यापीठात मोकळ्या जागेत चक्क गुरं चारली जातायत. (Mumbai University cattle senate)

मुंबई विद्यापीठात गुरांचा वर्ग, कलिना कॅम्पसमधील टेनिस कोर्टात गुरं चरायला
अशा प्रकारे विद्यापाठात गुरं चारण्यासाठी आणले जात आहेत.
Follow us on

मुंबई : उच्च दर्जाच्या शिक्षण मिळणारं ठिकाण म्हणून ख्याती असलेल्या मुंबई विद्यापीठात (Mumbai University) वेगवेगळे प्रकार समोर येत आहे. हजारो विद्यार्थ्यांना घडवणाऱ्या या विद्यापीठात मोकळ्या जागेत गुरं चारली जातायत. विद्यापीठाच्या कलिना संकुलातील मैदानात टेनिस कोर्ट असेलेल्या मोकळ्या जागेचा उपयोग होत नसल्यामुळे या ठिकाणी गुराखी गुरांना घेऊन येत आहेत. युवासेनेच्या सिनेट (senate) सदस्यांनी शुक्रवारी या जागेची पाहाणी केल्यानंतर हा प्रकार समोर आला. (Cattle coming for grazing to Mumbai University, senate deamnds action)

टेनिस कोर्टव्यतिरिक्त जागेचा वापर नाही

मुंबई विद्यापीठातील कलिना संकुलातील जवळपास 7 एकर जागा टेनिस संघटनेला अधिकृतरित्या देण्यात आलेली आहे. टेनिस खेळाला चालना मिळावी हा या मागचा उद्देश होता. मात्र दिलेल्या जागेपैकी टेनिस कोर्ट बांधलेल्या जागेच्या व्यतिरिक्त इतर जागेचा टेनिस संघटनेकडून वापर केला जात नाही. परिणामी ही जागा पडीत असून य़ेथे गुरांना चरण्यायोग्य कुरण निर्माण झाले आहे.  त्यामुळे टेनिस कोर्टाच्या मोकळ्या मैदानावर गुराखी आपली गुरे चारायला आणत आहेत.

सिनेट सदस्यांनी पाहणी केल्यानंतर प्रकार उघडकीस

टेनिस संघटनेला दिलेल्या जागेचा उपयोग कसा होतोय?, हे पाहण्यासाठी विद्यापीठाच्या युवासेनेच्या सिनेट सदस्यांनी टेनिस कोर्टची शुक्रवारी पाहणी केली. तसेच, विद्यापीठाची जागा टेनिस संस्थेला किती वर्षांसाठी दिली आहे? याबाबतच्या कराराचे स्वरुप काय आहे? ही माहिती सिनेट सदस्यांना हवी होती. मात्र, सिनेटचे सदस्य या ठिकाणी पोहोचल्यानंतर टेनिस कोर्टा  असलेल्या जागेचा वापर गुरांना चारण्यासाठी होत असल्याचे सदस्यांना दिसले. विद्यापीठात गुरं चारताना पाहून ते अवाक् झाले.

दरम्यान, मुंबई विद्यापीठात गुराखी आणि गुरं दिसल्यामुळे या किस्स्याची चर्चा अनेक भागात होत आहे. युवासेनेचे सिनेटही आश्चर्यचकित झाले असून, त्यांच्याकडून कारवाईची मागणी केली जात आहे.

 

संबंधित बातम्या :

मुंबई विद्यापीठातही शिवसेना विरुद्ध राज्यपाल संघर्ष, कारण काय?

मुंबई विद्यापीठातील कुलसचिव नेमणुकीच्या वादात सरकारला दणका; बळीराम गायकवाडांकडे पुन्हा सूत्रे

Mumbai | राज्यातील राजकारणानंतर आता मुंबई विद्यापीठातही शिवसेना विरुद्ध राज्यपाल संघर्ष

(Cattle coming for grazing to Mumbai University, senate deamnds action)