मध्य रेल्वे विस्कळीत,कर्मचाऱ्यांनो घरी परताना सावधान,बदलापूरात मालगाडी अडकल्याने गोंधळ

| Updated on: Jul 31, 2024 | 6:55 PM

बदलापूर येथे मालगाडीला चुकीचा सिग्नल दिल्याने ती कर्जला जाण्याऐवजी बदलापूरच्या होम प्लॅटफॉर्मवर अ़डकली आहे. तिला काढण्याचे प्रयत्न सुरु आहेत. परंतू त्यास दोन तास लागतील असे म्हटले जात आहे. त्यामुळे कल्याणच्या पुढे दक्षिण - पूर्व मार्गावरील कर्जतला जाणाऱ्यांचे वांदे झाले आहेत.

मध्य रेल्वे विस्कळीत,कर्मचाऱ्यांनो घरी परताना सावधान,बदलापूरात मालगाडी अडकल्याने गोंधळ
badlapur to karjat line distrub
Follow us on

गेले अनेक दिवस मध्य रेल्वेचे घसरलेले वेळापत्रक काही सुधारण्याचे नाव घेत नसल्याचे वारंवार उघड झाले आहे. मध्य रेल्वेच्या ठाण्यापलिकडला प्रवास म्हणजे प्रवाशांना धडकीच भरविणारा बनला आहे. आज मालगाडीला चुकीचा सिग्नल दिल्याने ती कर्जतला न जाता बदलापूरच्या होम प्लॅटफॉर्मवर आल्याने कर्जतकडे जाणारी वाहतूक ठप्प झाली आहे.या प्रकाराने कर्जतकडे जाणारी लोकल सेवा ठप्प झाली आहे. हा गोंधळ ऐन पिकअवरला सायंकाळी मुंबईकर कामावर घरी परतताना झाल्याने याचा मोठा फटका बसणार आहे. त्यामुळे चाकरमान्यांनी कामामधून निघताना नीट अंदाज घेऊन तयारीनेच बाहेर पडावे अशी परिस्थिती आहे.

मध्य रेल्वेच्या सीएसएमटी येथील सिग्नल यंत्रणा बदल्यानंतर जो मध्य रेल्वेचा गोंधळ सुरु झाला आहे.तो अद्यापही रुळावर आलेला नाही. त्यामुळे मध्य रेल्वेच्या दररोज अनेक फेर्‍या रद्द होत आहेत. मालगाडीला चुकीचा सिग्नल दिल्याने कर्जतकडे जाणारी मालगाडी बदलापूरच्या होम प्लॅटफॉर्मवर आल्याने कर्जतकडे जाणारा रेल्वे मार्ग आणि बदलापूरचा होम प्लॅटफॉर्म असे दोन्ही मार्ग बंद झाले आहेत. मालगाडी लवकर सुरु होण्याची कोणतीही शाश्वती नसल्याने या गोंधळाचा फटका सायंकाळी उशीरापर्यंत जाणविणार असल्याचे म्हटले जात आहे. या गोंधळाने रेल्वे स्थानकांवर प्रवाशांची गर्दी झाली आहे.

अंबरनाथ स्थानकात मोठी गर्दी

अंबरनाथ रेल्वे स्थानकात प्रवाशांची मोठी गर्दी झाली आहे. अंबरनाथहून मुंबईकडे जाणारा अप मार्ग सुरळीत आहे. परंतू कर्जतच्या दिशेने जाणाऱ्या डाऊन लोकलचा मार्ग ठप्प झाला आहे. कर्जत खोपोली लोकल ट्रेन रद्द केल्या जात आहेत. आणि अंबरनाथहून पुन्हा उलट दिशेने सोडल्या जात आहेत. त्यामुळे कर्जतला जाणाऱ्या प्रवाशांचे वांदे झाले आहेत. ही मालगाडी येथून सुरळीतपणे बाहेर काढण्यात दोन तासांचा अवधी लागू शकतो असे उघडकीस आल्याने कर्जतला जाणाऱ्या प्रवाशांचे वांदे झाले आहे. बदलापूर, खोपोली, कर्जतला जाणाऱ्या डाऊन लोकल रद्द करुन पुन्हा रिर्टन सीएसएमटी येथे स्पेशल लोकल म्हणून पाठविण्यात येत आहेत. त्यामुळे अंबरनाथ ते कर्जतचा मार्ग बंद झाला आहे.