मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रवाशांसाठी मध्य रेल्वे स्थानकात स्वयंचलित व्हेंडिंग मशीनमधून मास्क, सॅनिटायझर आणि हँडग्लोव्हज देण्याचा निर्णय घेतला आहे. लवकरच ही सुविधा छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, दादर आणि लोकमान्य टिळक टर्मिनस स्थानकांवर उपलब्ध होईल. याशिवाय 12 स्थानकांत हेल्थ एटीएमही बसवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. (Central Railway Automatic vending Machine for Mask, Sanitizer, Hand gloves)
आरोग्य मंत्रालयाने रेल्वे प्रवाशांसाठी दिलेल्या प्रवासाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार, प्रवाशांनी मास्क वापरावा, हातांची स्वच्छता, श्वसनाचे आरोग्य पालन केले पाहिजे. तसेच पर्यावरणीय स्वच्छता राखली पाहिजे. कोविड 19 प्रतिबंधात्मक साहित्य रेल्वेच्या आवारात प्रवाशांसाठी सहज उपलब्ध करुन देण्याच्याही सूचना आहेत. त्यानुसार स्वयंचलित व्हेंडिंग मशीनमधून हँडग्लोव्हज, सॅनिटायझर, मास्क उपलब्ध केले जाणार आहे.
TOP 9 | लोकल ते ग्लोबल, सर्व बातम्या एकत्र, पाहा टॉप 9 न्यूज!
याशिवाय मुंबईत अपुरा वेळ आणि वेगवान जीवनामुळे काहींना नियमित आरोग्य तपासणी करता येत नाही. प्रवाशांच्या आरोग्य तपासणी करण्यासाठी कल्याण, ठाणे आणि लोकमान्य टिळक टर्मिनस या ठिकाणी हेल्थ एटीएम किओस्क सुरु केले आहेत.
सीएसएमटीसह वडाळा रोड, चेंबूर, पनवेल, दादर, कुर्ला, घाटकोपर, विक्रोळी, भांडुप, मुलुंड, डोंबिवली आणि बदलापूर या रेल्वेच्या स्थानकांवर हेल्थ एटीएम बसवण्यासाठी ई-निविदा मागवल्या आहेत.
Mahafast 100 | बुलेटच्या वेगाने 100 बातम्या, ‘महाफास्ट’ रोज रात्री 7.56 वा. टीव्ही 9 मराठीवर
रक्तदाब, मधुमेह, बॉडी मास इंडेक्स (बीएमआय) आणि इतर आरोग्याशी संबंधित 16 ते 18 प्रकारची आरोग्य तपासणी ग्राहकांना या ठिकाणी मिळू शकते. त्याशिवाय त्वरित आरोग्य तपासणी करण्याची इच्छा असणारा कोणताही प्रवासी यापैकी कुठल्याही वैद्यकीय किओस्कमध्ये तपासणीसाठी जाऊ शकेल.
तसेच या ठिकाणी वैद्यकीय परिचारक कर्मचारी असतील. या सेवांमध्ये 16 प्रकारची चाचणी केवळ फक्त 50 रुपयांमध्ये होणार आहे. तसेच हिमोग्लोबिन आणि रक्तदाबासाठीच्या 18 प्रकारच्या चाचणीसाठी 100 रुपये होतील. (Central Railway Automatic vending Machine for Mask, Sanitizer, Hand gloves)
संबंधित बातम्या :
वरळी कोळीवाड्याची कोरोनामुक्तीकडे वाटचाल, 90 टक्के परिसर कंटेन्मेंट झोनबाहेर
Panvel Unlock | पनवेलमध्ये ‘मिशन बिगीन अगेन’, कंटेन्मेंट झोन वगळता अन्यत्र सशर्त अनलॉक