मुंबई : मध्य रेल्वेची (central railway) मुंबईकडे येणारी वाहतूक विस्कळीत झाली आहे. मालगाडीचं इंजिन कर्जतमध्ये खराब झाल्यामुळे हा खोळंबा झाल्याचं माहिती मिळाली आहे. त्यामुळे सकाळी मुंबईकडे (mumbai news) कामावर निघालेल्या नोकरदारांना चांगलाचं उशिर होणार आहे. दोन दिवसांपासून मुंबईत मान्सूनपूर्व पाऊस (monsoon update) सुरु झाला आहे. प्रत्येकवर्षी पावसात ट्रेन गाड्या शिस्तीत चालवल्या जातात. आज इंजिन खराब झाल्यामुळे ट्रेनला गर्दी सुद्धा वाढली आहे. मालगाडीचं इंजिन बाजूला केल्यानंतर मध्ये रेल्वे वाहतूक सुरळीत होईल.
दोन दिवसांपूर्वी मुंबईत मान्सूनपूर्व पाऊस सुरु झाला आहे. कालपासून महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढला आहे. पहिल्याचं पावसात मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाल्यामुळे नागरिक संताप व्यक्त करीत आहे. मुंबईकडे निघालेल्या मालगाडीचं इंजिन कर्जतमध्ये खराब झाल्यामुळे इतर गाड्यांना उशिर झाला आहे.
सकाळी मुंबईत कामासाठी निघालेल्या नोकरदारांना याचा मोठा फटका बसला आहे. वेळेत ऑफिसला पोहोचता येणार नाही. पावसाळ्यात रेल्वे इंजिन खराब होण्याच प्रमाण अधिक असतं. त्यामुळे रेल्वेकडून अधिक काळजी सुध्दा घेतली जाते. मालगाडीचं इंजिन बाजूला केल्यानंतर वाहतुक सुरळीत होणार आहे. अचानक खोळंबा झाल्यामुळे मध्य रेल्वेला गर्दी वाढली आहे. आज मुंबईसह महाराष्ट्रात पावसाची शक्यता आहे.
ही बातमी आताच ब्रेक झाली आहे. या बातमीला आम्ही अजुनही अपडेट करत आहोत. तुम्हाला सर्वात आधी माहिती पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यामुळे ह्या पेजला रिफ्रेश करत चला. तसेच आमच्या इतर स्टोरीज वाचण्यासाठी इथं क्लिक करा.