मुंबईः भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांनी अभिनेत्री उर्फी जावेदला तिच्या अंगप्रदर्शनावरून थोबडून काढण्याची भाषा केल्यानंतर राज्यातील वातावरण तापले आहे. उर्फी-चित्रा वाघ यांचा वाद वाढत असतानाच वकील नितीन सातपुते यांनी चित्रा वाघ यांच्या जाहीर वक्तव्याविषयी राज्य महिला आयोगाकडे थेट तक्रार केल्यानंतर हे प्रकरण अधिकच तापले आहे. तर महिला आयोगाकडून चित्रा वाघ यांच्याबद्दल वक्तव्य केल्यानंतर आणि रुपाली चाकणकर यांनी वक्तव्य केल्यानंतर मी कुणाच्या बापालाही घाबरत नाही असा पलटवार चित्रा वाघ यांनी केला होता.
त्यावर बोलताना महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी सांगितले की, महिला आयोगाची गरिमा खूप मोठी आहे. राज्यातील अनेक महिलांचे प्रश्न सोडवण्याची जबाबदारी महिला आयोगाकडे आहे.
त्यामुळे कोण काय बोलतय आणि कोण काय म्हणतय याकडे लक्ष द्यायला महिला आयोगाकडे वेळ नाही असा टोला चित्रा वाघ यांना लगावण्यात आला.
चित्रा वाघ यांनी उर्फी जावेदच्या अंगप्रदर्शनावरून तिला थोबडण्याची भाषा केली होती. त्यामुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न राज्यात निर्माण होणार आहे.
त्याचबरोबर त्यांच्या या वक्तव्यामुळे उर्फी जावेदवर जीवघेणा हल्ला होऊ शकतो त्यामुळे चित्रा वाघ यांना शांततेचे आणि भडकाऊ वक्तव्य न करण्याच्या सूचना देण्यात याव्यात अशी मागणी वकील नितीन सातपुते यांनी महिला आयोगाकडे केली होती.
त्यावरही रुपाली चाकणकर यांनी बोलताना सांगितले की, विधी सेवा समितीबरोबर बोलून पुढील निर्णय महिला आयोग घेणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
अभिनेत्री उर्फी जावेदन महिला आयोगाकडे आपल्याला धमकी आल्याचे कळवले आहे. त्याचबरोबर तिला धमकीचे फोन येत असून उर्फी जावेदकडून लेखी तक्रार आल्यानंतर संबंधित विभागांना ही माहिती देऊन त्या संदर्भात कारवाई केली जाईल असंही महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी सांगितले.
भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांना मी कुणाच्या बापालाही घाबरत नाही असा टोला महिला आयोगाच्या रुपाली चाकणकर यांना लगावला होता. त्यावर बोलताना रुपाली चाकणकर यांनी त्यांना एकाच वाक्यात उत्तर दिले आहे. त्या म्हणाल्या की, याआधीच राज्याभरातील महिलांचे प्रश्न सोडवण्यासाठी महिला आयोग प्रयत्न करत आहे.
त्यामुळे महिला आयोगाला सध्या कोण काय म्हणतय आणि कोण काय बोलतय याकडे लक्ष द्यायलाही वेळ नाही असा टोला रुपाली चाकरणकर यांनी चित्रा वाघ यांना लगावला आहे.