मुंबई : अनिल देशमुख यांना आज चांदीवाल आयोगाने पुन्हा दंड ठोठावला. यावेळी दंडाची रक्कम मोठी होती. यावेळी चक्क 50 हजार रुपये दंड ठोठावण्यात आला. ही रक्कम मुख्यमंत्री सहायता निधीत जमा करा, असे आदेशही न्या के यु चांदीवाल यांनी दिलेत. सतत सुनावणीसाठी वेळ मागितला जात असल्याने अखेर न्या चांदीवाल यांनी हे पाऊल उचललं असल्याचं म्हटलं जातं आहे.
न्या. के. यु. चांदीवाल यांच्या आयोगात आज सुनावणी होती. आज सचिन वाझे याची उलट तपासणी होती. ही उलट तपासणी अनिल देशमुख यांचे वकील गिरीश कुलकर्णी हे घेणार होते. मात्र ऍड गिरीश कुलकर्णी आलेच नाहीत. याबाबत न्या चांदीवाल यांनी नाराजी व्यक्त केली. आज सुनावणी होणार हे आधीच ठरलं होतं. यापूर्वी 8 डिसेंबर रोजी सुनावणी झाली होती. यावेळी आजची तारीख निश्चित करण्यात आली होती. याबाबत वकिलाशी सल्ला मसलत करण्यासाठी अनिल देशमुखांना खास जेलमधून बोलावून वकिलाशी भेटण्यासाठी वेळ दिली होती. यानंतरही अनिल देशमुख यांचे वकील आले नाहीत. याबाबत नाराजी व्यक्त करत न्यायमूर्ती चांदीवाल यांनी आता सचिन वाझे यांची उद्याच उलट तपासणी संपवा अथवा उलट तपासणी संपली असं जाहीर करा, असे सांगितले.
मात्र, तसं जाहीर करण्यास अनिल देशमुख यांचे इतर वकील तयार नव्हते. यामुळे मग उद्याच्या उद्या उलट तपासणी घ्या असे आदेश न्या चांदीवाल यांनी दिलेत. त्याच प्रमाणे वेळ वाढवून मागितल्याबद्दल अनिल देशमुख यांना 50 हजार रुपयांचा दंड ठोठावला आणि दंडाची ही रक्कम तात्काळ मुख्यमंत्री निधीत जमा करण्याचे आदेश दिलेत. यामुळे न्या चांदीवाल यांनी आदेश दिल्यानंतर आता सचिन वाझे याची उद्या अनिल देशमुख यांच्या वकिलांना उलट तपासणी घ्यावी लागणार आहे. (Chandiwal Commission imposes fine of Rs 50,000 on Anil Deshmukh)
इतर बातम्या
Tamilnadu Crime: युट्यूबवर पाहून चोरट्याने ज्वेलर्सच्या दुकानातून लुटले तब्बल 10 कोटींचे सोने
Mumbai Crime: बादशाह मलिकला 24 डिसेंबरपर्यंत ईडी कोठडी, मनी लाँड्रिंग प्रकरणी कारवाई