मुंबईः गेल्या आठवड्यात उच्च व तंत्रशिक्षण मत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर महापुरुषांचा अपमान केला. म्हणून त्या घटनेच्या निषेधार्थ शाईफेक करण्यात आली होती. त्यानंतर शाईफेक करणाऱ्या मनोज गरबडे याच्यावर कलम 307 कलम लावून सदोष मनुष्यवधाचा गुन्हाही त्यांच्यावर नोंद करण्यात आला होता.
त्यानंतर गृहमंत्र्यालयावर जोरदार टीका करण्यात आली होती. त्या घटनेनंतर माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर आंदोलकांवर खोटे गुन्हे नोंद केल्याने जोरदार टीका केली आहे.
मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर शाईफेक करण्यात आल्यानंतर आंदोलकांवर खोटे गुन्हे नोंद करण्यात आले. त्यानंतर मनोज गरबडे यांची सुटका होण्यासाठी राज्यातील विविध वकिलांनी त्यांच्यासाठी प्रयत्न केले.
त्यानंतर आज मनोज गरबडे यांनी केलेल्या शाईफेक प्रकरणावर आणि आंदोलकांवर लावण्यात आलेल्या गुन्ह्यावर बोलताना शिंदे-फडणवीस सरकारने असे करणे चुकीचे असल्याचे त्यांनी सांगितले. पुण्यातील आंदोलकांवर गुन्हे नोंद करण्याआधी माझ्यावरही 354 कलम लावून गुन्हा नोंद करण्यात आला होता.
त्यानंतर पुण्यातील आंदोलकांवर 307 कलम लावून खोटा नोंद करणे म्हणजे सरकारचा हा अतिरेकीपणा असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.
सरकार मायबाप सरकार असते. त्यामुळे आंदोलकांवर असे खोटे गुन्हे नोंद करून आंदोलकांवर वेगवेगळी कलमं लावणं चुकीचे आहे. सरकारविरोधात आंदोलन होणारच आहे. त्यामुळे राग हा सरकारला येताच कामा नये. सरकार मायाळू, दयाळू आणि प्रेमळ पाहिजे.
शिंदे-फडणवीस सरकारमधील मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर शाईफेक करण्यात आल्यानंतर सरकारने जो अतिरेकीपणा दाखवला आहे तो असताच कामा नये अशी मागणीही त्यांनी केली आहे.