सोशल मीडियावरुन नोकरीचं आमिष दाखवून लाखो रुपयांचा गंडा

| Updated on: Aug 25, 2019 | 9:31 AM

देशात सध्या मोठ्या प्रमाणात सोशल मिडियाचा वापर केला जात आहे.  वाढला आहे. याच सोशल मीडियावरुन तरुणांना नोकरीचं आमिष दाखवून त्यांची फसवणूक केली जात आहे.

सोशल मीडियावरुन नोकरीचं आमिष दाखवून लाखो रुपयांचा गंडा
'माघ मेला'मध्ये टेक्नेलॉजीसह सोशल मीडियाचा वापर
Follow us on

मुंबई : देशात सध्या मोठ्या प्रमाणात सोशल मिडियाचा वापर केला जात आहे.  वाढला आहे. याच सोशल मीडियावरुन तरुणांना नोकरीचं आमिष दाखवून त्यांची फसवणूक केली जात आहे. तरुणांकडून पैसे उकळून त्यांना गंडा घालणाऱ्या टोळीला मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. विशेष म्हणजे या टोळीचे कॉल सेंटरही होते.

नोकरी ही प्रत्येकासाठी गरजेची असते आणि सध्या चांगली नौकरी लोकांना मिळत नाही. चांगली नोकरी मिळवण्यासाठी अनेकजण प्रयत्न करत असतात. सध्या सोशल मीडियावर अनेक प्लेसमेंटकडून नोकरीच्या जाहीराती प्रसिद्ध केल्या जातात. त्यामुळे अनेकजण या जाहिरातींवर क्लिक करुन नोकरीसाठी अर्ज करतात. अर्ज केल्यानंतर तुम्हाला कॉल येतो आणि नोकरीचं आमिष दाखवून तरुणांकडून पैसे उकळले जात होते. त्यामुळे आतापर्यंत अनेकांची यामध्ये फसवणूक झाली आहे.

मुंबई पोलीसांनी उत्तर प्रदेश आणि दिल्लीमधून या टोळीला पर्दाफाश केला आहे. दिल्लीच्या नोएडा परिसरात आरोपी ऑफिस घेऊन कॉल सेंटर चालवत होते. आरोपी हे पीडित लोकांकडून पैसे घेत तुमची नोकरी पक्की होईल, असं सांगून पैसे उकळायचे.

या टोळीने मोठ्या प्रमाणात लोकांची फसवणूक केली आहे, असा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. जर कोणाची अशी फसवणूक झाली असेल तर त्यांनी तातडीने आपल्या जवळच्या पोलीस स्टेशनला संपर्क करा, असं आवाहन पोलिसांनी केलं आहे.