मुंबई : राज्यात कोरोनाबाधितांचा आकडा 335 वर पोहोचला (Chembur Baby Tested Corona Positive) आहे. मुंबईत आज 30 नवे कोरोनाग्रस्त रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे मुंबईत कोरोनाबाधितांची संख्या 181 वर पोहोचली आहे. यामुळे प्रशासनाकडून वारंवार खबरदारी घेतली जात आहे. तर दुसरीकडे मात्र चेंबूरच्या एका रुग्णालयात धक्कादायक प्रकार समोर आला आहे. चेंबूरमधील एका रुग्णालयात 3 दिवसांच्या बाळाला आणि त्याच्या आईला कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. धक्कादायक बाब म्हणजे या महिलेच्या डिलिव्हरी वॉर्डात कोरोना पेशंट असल्याचा आरोप तिच्या पतीने केला आहे.
चेंबूरमध्ये तीन दिवसांच्या बाळाला कोरोनाची लागण झाली (Chembur Baby Tested Corona Positive) आहे. या बाळाची प्रकृती नाजूक आहे. ही बातमी कळल्यानंतर या बाळाच्या पित्याला अश्रू अनावर झाले. पत्नीच्या डिलिव्हरी वॉर्डात कोरोना पेशंट असल्याचा एक व्हिडीओ त्यांनी बनवला आहे.
या व्हिडीओत त्यांना त्या रुग्णालयावर हलगर्जीपणाचा आरोप केला आहे. त्यांनी हा व्हिडीओ तयार करुन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना लक्ष देण्याची विनंती केली आहे. दरम्यान या बाळावर आणि त्याच्या आईवर कस्तुरबा रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
राज्यात कोरोनाबाधितांचा आकडा 335 वर पोहोचला आहे. आज (1 एप्रिल) दिवसभरात 33 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. यात 30 रुग्ण हे मुंबईतील असून दोन पुण्यातील आणि एक बुलडाण्यातील रुग्णाचा समावेश आहे. यामुळे राज्यातील कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या 335 वर पोहोचली आहे. तर दुसरीकडे मुंबईत आज दिवसभरात 5 कोरोनाग्रस्तांचा मृत्यू झाला (Chembur Baby Tested Corona Positive) आहे.
जगातील सर्वात मोठी झोपडपट्टी असलेल्या धारावीतही कोरोनाचा शिरकाव झाला आहे. धारावीत झोपडपट्टीत राहणाऱ्या 55 वर्षीय पुरुषाचा रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. यामुळे त्याच्या कुटुंबीय निरीक्षणाखाली ठेवण्यात आले आहे. तसेच तो राहत असलेली इमारत पूर्णपणे सील करण्यात आली आहे. या व्यक्तीने कुठेही परदेशी प्रवास केलेला नाही. त्याच्या घरातील 8 जणांना होम क्वारंटाईन करण्यात आलं आहे.
महाराष्ट्रात कोठे किती रुग्ण?
मुंबई – 181
पुणे – 38
पिंपरी चिंचवड – 12
सांगली – 25
नागपूर – 16
कल्याण – 10
नवी मुंबई – 8
अहमदनगर – 8
ठाणे – 8
वसई विरार – 6
यवतमाळ – 4
बुलडाणा – 4
पनवेल – 2
सातारा – 2
कोल्हापूर – 2
पालघर- 1
उल्हासनगर – 1
गोंदिया – 1
औरंगाबाद – 1
सिंधुदुर्ग – 1
रत्नागिरी – 1
जळगाव- 1
नाशिक – 1
इतर राज्य (गुजरात) – 1
एकूण 335