मुंबई : राज्यात कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा 3 हजार 320 वर पोहोचला (Chembur Corona Hotspot) आहे. यातील 2 हजार 085 रुग्ण हे एकट्या मुंबईत आढळले आहे. त्यामुळे मुंबई हो कोरोनाचा हॉटस्पॉट बनत चालला आहे. त्यातच वरळी, लोअर परेल, प्रभादेवी यानंतर आता चेंबूरच्या पीएल लोखंडे मार्ग परिसरात 34 जणांना रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे चेंबूरचे पीएल लोखंडे मार्ग हे कोरोनाचं नवं हॉटस्पॉट ठरत असल्याचे बोललं जात आहे.
चेंबूरच्या पीएल लोखंडे मार्ग परिसरात आतापर्यंत 34 जणांचा रिपोर्ट (Chembur Corona Hotspot) कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. तर तब्बल 70 जणांना क्वारंटाईन करण्यात आले आहे. या परिसरातील कोरोना पॉझिटिव्ह लोकांचा महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाकडून शोध घेतला जात आहे.
या परिसरातील कोरोना पॉझिटिव्ह असलेल्या लोकांचा शोध घेण्यासाठी पालिकेकडून प्रयत्नांची पराकाष्ठा केली जात आहे.
याच पार्श्वभूमीवर येत्या सोमवारपासून जवळच्या मनपा शाळेत कम्युनिटी क्लिनिक सुरु करण्यात येणार आहे. या क्लिनिकदरम्यान स्वत: खासदार राहुल शेवाळे हजर राहणार आहे.
पीएल लोखंडे मार्ग या परिसरात मोठ्या प्रमाणात झोपडपट्टी आहे. या झोपडपट्टीत जवळपास 40 हजाराहून अधिक लोक राहतात. त्यामुळे वरळी कोळीवाडा, धारावी परिसरातील कोरोना रुग्णांमध्ये ज्या प्रकारे वाढ होत आहे. त्याचप्रकारे चेंबूरमध्येही कोरोनाग्रस्त रुग्णांमध्ये वाढ होऊ नये यासाठी प्रयत्न केले जात आहे.
राज्यात कोरोनाचे वाढते रुग्ण
राज्याच्या आरोग्य विभागाने काल १७ तारखेला जारी केलेल्या आकडेवारीनुसार, राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 3320 वर पोहोचली आहे (Total Corona Patient in Maharashtra). राज्यात आतापर्यंत 331 रुग्ण बरे झाले असून त्यांना घरी सोडण्यात आलं असल्याची माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली (Total Corona Patient in Maharashtra).
राज्यात आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या 61 हजार 740 नमुन्यांपैकी 56 हजार 964 जणांचे प्रयोगशाळा नमुने कोरोना निगेटिव्ह आले आहेत तर 3320 जणांचे नमुने कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 74 हजार 587 लोक होम क्वारंटाईनमध्ये असून 6376 लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये (Chembur Corona Hotspot) आहेत.