मागच्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते अजित पवार नाराज असल्याची चर्चा आहे. यावर राजकीय वर्तुळात चर्चा होत आहे. सुनेत्रा पवार यांना राज्यसभेची उमेदवारी दिली गेल्याने छगन भुजबळ हे नाराज असल्याची चर्चा आहे. यावर आता खुद्द छगन भुजबळ यांनी स्वत: यावर प्रतिक्रिया दिली आहे. मी नाराज आहे असं कधी म्हणालो आहे का? पक्षात राहून कधी- कधी काही गोष्टी मिळतात. काही मिळत नाहीत. आपण काम करत राहायचं असतं, असं छगन भुजबळ म्हणालेत. ते मुंबईत माध्यमांशी बोलत होते.
समता परिषदेची बैठक नव्हती. आमचे सात ते दहा आठ चाहत्यांनी बैठक घेतली. वेगवेगळ्या बैठकी झाल्याचं पाहायला मिळालं. निवडणुकीत का कस पडलं यांचा आढावा घेतला. समता परिषदेच्या अनेक लोकांना बोलवणार आहेत. दिल्लीत नरेंद्र मोदी साहेब आलेले आहेत. त्यांच्यापुढे मागणी केली पाहिजे. जातनिहाय्य जनगणना करण्याची मागणी केली पाहिजे, असं छगन भुजबळ म्हणालेत.’
ओबीसीच्या बाबतीत प्रकाश पडेल त्यांची परिस्थितीत काय ते.. एससी आणि एनटीला मिळतील तर ओबीसींना भारत सरकारकडून फंड मिळतील. राज्यापुरती केली तर तसे ओबीसीला येत नाही. मंगेश ससाणे आणि लक्ष्मण हाके उपोषणाला बसलेले आहेत. उपोषणाला वेगवेगळ्या ठिकाणी उपोषणाला बसलेले आहेत. त्यांनी उपोषण थांबायला हवं. आम्ही यांच्यातून मार्ग काढण्याचा प्रयत्न करतोय. ओबीसींवर अन्याय होत असतील सुधारणा करणार आहोत. आत्मसमर्पणानं काम करायला हवं. थोडं आपण थांबायला पाहिजे, असंही छगन भुजबळ म्हणाले.
जणगणना भारत सरकारने मंजूर केली तर सगळं होईल. 54 टक्के ओबीसी आहेत असं म्हणतात. आमचे बरोबर असेल तर ठिक… भारत सरकारकडे मागणी करता येईल. पॉझिटिव्ह परिणाम होईल. आज अतुल सावे , भुमरे , कराड लक्ष्मण हाके शिष्टमंडाळाला भेटले. आम्हीही त्यांच्याशी बोलतो आहोत. एकदम टोकाचा निर्णय घेवू नका असं सांगितलं आहे, असंही छगन भुजबळ यांनी सांगितलंय.