मुंबई : वाढदिवसाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळांनी अनेक जुन्या आठवणींना उजाळा दिला. छगन भुजबळ म्हणाले, पुतळ्याची विटंबना झाली. माझ्या घरावर हल्ला झाला. हाच तो नराधम, असं सामनानं छापलं. यानच विटंबना केली, असा माझ्यावर थेट आरोप लावला गेला. हायकोर्टाचे जज गुंडेवार कमिटीनं क्लीन चीट दिलं. सामनावर मी केस टाकली. काही महिन्यानंतर सुभाष देसाई आले. संजय राऊत आले. म्हणाले, बाळासाहेबांचं वय झालं. केस मागे घ्यायची आहे. म्हणून जजला विनंती केली. त्यांनी केस मागे घेतली. बाळासाहेबांना आठ दिवसांनी मातोश्रीवर बोलावलं. खाणे-पिणे सर्वच झाले. जणू काही भांडण झालंचं नाही. असा किस्सा छगन भुजबळ यांनी सांगितला.
भाजपच्या कार्यकारिणीमध्ये दुसऱ्याला बोलावत नाही. पण, बाळासाहेब ठाकरेंना बोलावलं होतं. बाळासाहेबांना मला सोबत घेतलं. मी गेलो. तेव्हा अटल बिहारी वाजपेयी म्हणाले, आपके पास भुजबल हैं तो हमारे पास बुद्धिबल हैं. दोनो अगर एक हो जाये तो चमत्कार हो जायेगा. तो संदेश त्यांनी दिला.
मग, मी, मनोहर जोशी शिवसेनेच्या बाजूनं, तर प्रमोद महाजन, महादेवराव शिवणकर हे दुसऱ्या बाजूनं. मग,वाटाघाटी सुरू झाल्या. विधानसभेला शिवसेना जास्त जागा लढविणार आणि लोकसभेला भाजप जास्त जागा लढविणार, असं ठरलं, अशी माहिती भुजबळ यांनी दिली.
शिवसेना सोडली तेव्हा मला ज्येष्ठ संपादकानं सांगितलं, कुठेही जा. पण, भाजपात जाऊ नका. पवार साहेब समता परिषदेच्या पाठीशी उभे होते. मंडल आयोगाची अंमलबजावणी करा, अशी मागणी केली. तेव्हा पवार साहेबांनी एका महिन्याच्या आता राजकारण, शैक्षणिक क्षेत्रात आरक्षण दिलं, असंही त्यांनी सांगितलं.
महात्मा फुल्यांना बाबासाहेब आंबेडकरांनी गुरू मानलं. आंबेडकरांचं नाव मराठवाडा विद्यापीठाचं नाव दिलं. एक महिन्याच्या आत मराठवाडा विद्यापीठाला नाव देणार असं ठरलं. पवार साहेब नेहमी पाठीशी असायचे, अशी आठवण भुजबळ यांनी करून दिली.
एकदा पंतप्रधान असताना व्ही. पी. सिंग यांनी बोलावलं. म्हणाले, तुम्हाला ओबीसींचा नेता बनायचं आहे. मी म्हटलं, बघतो. शिवसेना सोडली. मग काँग्रेसवाले म्हणाले बघा तुमचं तुम्ही. पुण्यात शरद पवार यांच्यासोबत बैठक झाली होती, असंही ते म्हणाले.