पुणेः हिवाळी अधिवेशनामध्ये विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी छत्रपती संभाजी महाराज यांना स्वराज्यरक्षक म्हटले आणि सगळा महाराष्ट्र पेटून उठला. त्यांच्यावर विरोधकांनी प्रचंड टीका करत त्यांनी माफी मागावी अशी मागणी केली. स्वराज्यरक्षक या शब्दावरूनच राजकारण आणि इतिहास कसा घडला असल्याचे सांगत राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी छत्रपती संभाजी महाराज यांच्याविषयीचा सगळा इतिहास सांगितला.
यावेळी त्यांनी सांगितले की, ज्या संभाजी महाराज यांनी सतराव्या वर्षी राज्य चालवण्यासाठी पाऊल उचललं त्या संभाजी महाराज यांना कैकदा अनेक संघर्षांना सामोरे जावे लागले आहे.
यावेळी आमदार जितेंद्र आव्हाड यांनी जेम्स लेन भारतात आला आणि त्यांनी मांडलेल्या इतिहासामुळे दादाजी कोंडदेव हा छत्रपती शिवाजी महाराज यांचा गुरू नव्हता, तर तो त्यांच्या घरातील नोकर होता असं सांगितल्यामुळे साठ वर्षामध्ये खरा इतिहास समजला असल्याचे मत त्यांनी मांडले.
छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दल बोलताना जितेंद्र आव्हाड यांनी सांगितले की, छत्रपती संभाजी महाराज हे फक्त एका महाराजांचे बाळ नव्हते,
तर ते धैर्याने सगळ्या गोष्टींना सामोरे जाणारे, कवी कलशसारख्या मित्रासाठी स्वतःच्या वडिलांबरोबर वाद घालणारे आणि मित्रत्वाचा आदर्श सगळ्या जगासमोर दाखवून देणारे छत्रपती संभाजीमहाराज होते असंही त्यांनी यावेळी सांगितले.
छत्रपती संभाजी महाराज यांचा इतिहास साऱ्यांना सांगावा लागतो कारण आजपर्यंत छत्रपती संभाजी महाराज याना तुम्ही कोंडून ठेवले होते म्हणून सगळा इतिहास आता उघड करावा लागतो असंही त्यांनी यावेळी बोलून भाजपला टोला लगावला आहे.
विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी छत्रपती संभाजी महाराज यांना स्वराज्यरक्षक म्हणून त्यांनी त्यांचा उल्लेख केला आणि तोच त्यांचा खरा उल्लेख आहे असंही त्यांनी यावेळी स्पष्टपणे सांगितले.
छत्रपती संभाजी महाराज यांचा मृत्यू झाला कारण छत्रपती संभाजी महाराज हे येथील षडयंत्राचे आणि कटाचे खऱ्या अर्थाने बळी ठरले आहेत. कारण त्यावेळी त्यांच्याजवळचे लोकं ही घरभेदी ठरले असल्याची टीका आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे.