दत्ता कानवटे, प्रतिनिधी- टीव्ही 9 मराठी, छत्रपती संभाजीनगर | 20 मार्च 2024 : देशात लोकसभा निवडणूक होत आहे. अशात वंचित बहुजन आघाडी महाविकास आघाडी सामील होणार का? याची राजकीय वर्तुळात चर्चा होत आहे. यावर ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी भाष्य केलं आहे. कॉंग्रेसने 7 जागांवर समर्थन दिलं तर उरलेल्या जाग्यांवर प्रकाश आंबेडकर कॉंग्रेसच्या उमेद्वारांना पाडणार आहेत का? प्रकाश आंबेडकर कोड्यात टाकतात. प्रकाश आंबेडकर प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष संविधानाची हत्या करणाऱ्यांच्या समर्थनात राहणार नाहीत. उद्या शरद पवारांच्या निवासस्थानी आम्ही वंचित बहुजन आघाडीवर बद्दल चर्चा करणार आहोत. कोणताही प्रस्ताव अंतिम नसतो. उद्या यावर चर्चा होईल, असं संजय राऊत म्हणाले.
उद्या शरद पवारांच्या निवासस्थानी बैठक आहे. महाराष्ट्रातील 48 जागा महाविकास आघाडीला लढणार आहेत. वंचित बहुजन आघाडी, शेकाप सहभागी व्हावं, अशी आमची इच्छा आहे. अपक्ष लढणार नाहीत ते महाविकास आघाडीचे उमेद्वार असतील, असं संजय राऊतांनी म्हटलं.
उद्या कोल्हापूरात उध्दव ठाकरेंचं आगमन होणार आहे. ते श्रीमंत छत्रपती शाहू महाराजांना भेटणार आहेत. कोल्हापूरची जागा शिवसेनेची आहे. 30 वर्षांपासून शिवसेना तिथे लढत आहे. छत्रपती शाहूंना पुर्णपणे समर्थन देणार आहे. कोल्हापूरकडून सांगलीली जाणार आहेत. वसंतदादा पाटिलांना आदरांजली वाहणार आहेत, असं संजय राऊत म्हणाले.
छत्रपती संभाजीनगरात कुठेही लोकसभेत लढायची इच्छा होते. शिवसेना जेव्हा लढत आहेत. फक्त संभाजीनगरात एक उमेदवार आहेत. सगळीकडे शिवसेनेसाठी 4 इच्छुक उमेदवार आहेत. अंबादास दानवे आणि चंद्रकांत खैरे यांच्यात वाद नाही. अंबादास दानवेंकडे शिवसेनेच्या वाट्याचं सर्वात महत्वाचं पद आहे, असं संजय राऊत म्हणाले.
राज ठाकरे चांगले कलाकार आहेत. त्यांच्या मनातील खंत आहे. हे मला चांगलंच माहिती आहे. त्यांनी काढलेलं व्यंगचित्र मला फार आवडलं होतं. त्यांची भावना देशाच्या आहे. काल जर त्यांची भेट झाली असेल तर त्यांनी त्याबद्दल त्यांना सांगितलं असेल. राज ठाकरेंनी पुलवामा हत्याकांडाबद्दल काही वक्तव्य केली होती. अमित शाहांच्या भेटीत त्यांना उत्तर भेटलं असेल, असा उपरोधिक टोला संजय राऊतांनी लगावला आहे.