मुंबई : राज्यात बर्ड फ्लूचं (Bird Flu) संकट वाढत चाललं आहे. बर्ड फ्लूमुळे मुंबईतील नॉनव्हेज खाणाऱ्यांनी (Chicken Price Drop) आपला मोर्चा चिकनवरुन मटणाकडे वळवलाय. ज्याने चिकन दुकानदार हवालदिल झाले आहेत. चिकनचे दर हे 220 रुपयांवरुन घसरुन 160 वर आले आहेत (Chicken Price Drop).
एकीकडे चिकनचे दर 60 रुपयांनी घसरले आहेत. तर दुसरीकडे मटणाचे दर हे प्रति किलो 640 च्या घरात पोहोचले आहेत. मागणी वाढली की हे दर वाढण्याची भीतीही व्यक्त केली जाते. दुकानदार ग्राहक हे वारंवार चिकन सोडून मटणाची किंवा माशांची मागणी करत असल्याची तक्रार करत आहेत.
बर्ड फ्लूच्या भीतीपोटी ग्राहक काही दिवस चिकनपासून लांब राहण्याचा प्रयत्न करत आहेत. इतकंच नाही तर अंड्यांची विक्रीही कमी झाली आहे. मुंबईत अंड्यांचे दर 6 रुपयांवरुन 5 रुपयांवर घसरले आहेत. तर, येत्या दोन दिवसांत सरकारने ठोस निर्णय घेतला नाही तर अंडा बाजारात दर 3 ते 4 रुपयांवर येण्याची भीती अंडा व्यापाऱ्यांनी वर्तवली आहे.
देशभरात अनेक ठिकाणी बर्ड फ्लू झाल्यामुळे कावळे, कोंबड्या आणि अनेक पक्षी मरून पडल्याच्या बातम्या समोर येत आहेत. अशात आता चिकन किंवा अंडी खाल्यामुळे माणसांमध्येही हा रोग पसरले अशा बातम्या समोर येत आहेत. त्यामुळे नागरिकांनी चिकन आणि अंड्यांकडे पाठ फिरवली आहे. मात्र, चिकन किंवा अंडी खाल्ल्यामुळे बर्ड फ्लू हा माणसांना अजिबातच होत नाही. भारतात बर्ड फ्लू माणसांना झाल्याची आजपर्यंत एकही घटना घडलेली नाही. असं स्पष्टीकरण परभणीच्या पशु वैद्यकीय महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता नितीन मार्कंडेय यांनी दिली आहे. टीव्ही 9 मराठीला दिलेल्या खास मुलाखतीमध्ये त्यांनी ही माहिती दिली आहे. त्यामुळे चिकन किंवा अंडी खाल्याने बर्ड फ्लू माणसांना होत नाही हे उघड झालं आहे (Chicken Price Drop).
परभणीत 8 हजार, तर राज्यात 80 हजार कोंबड्यांची कत्तल केली जाणार आहे. महाराष्ट्रात 1200 पक्ष्यांचा बर्ड फ्लूने घास घेतल्याचं स्पष्ट झाल्यानंतर राज्य सरकारने पक्ष्यांना ठार करण्याचे आदेश दिले होते. त्यातच मराठवाडा बर्ड फ्लूचं केंद्र होत असल्याची भीती व्यक्त केली जात आहे. परभणी जिल्ह्यातील गावातून कोंबड्यांच्या कत्तलीला सुरुवात होणार आहे. जवळपास वीस पोल्ट्री फार्म्समधील 80 हजार कोंबड्या स्वाहा केल्या जाणार.
मुंबई, ठाण्यासह 11 जिल्ह्यात आतापर्यंत बर्ड फ्लूचा प्रादुर्भाव आढळला आहे. यामुळे 1200 पक्ष्यांना प्राण गमवावे लागले आहेत. यामध्ये 1112 कोंबड्या, तर उर्वरितांमध्ये कावळे, कबुतर, बगळे यांचा समावेश होता. मुंबई महानगर पट्ट्यात कावळ्यांसह इतर पक्षी मृतावस्थेत आढळल्याने चिंता वाढली होती.
Bird Flu | परभणीत 8 हजार, महाराष्ट्रात 80 हजार कोंबड्या स्वाहा केल्या जाणार, मराठवाडा बर्ड फ्लूचं केंद्र https://t.co/fYcFg2ujlb #BirdFlu | #Parabhani | #Chicken
— TV9 Marathi (@TV9Marathi) January 12, 2021
Chicken Price Drop
संबंधित बातम्या :
Bird Flu | कोंबडीचे मांस आणि अंडी खाल्ल्याने ‘बर्ड फ्लू’चा धोका? वाचा संशोधन काय म्हणतेय…
Bird Flu | मुंबईकर बर्ड फ्लूने धास्तावले, ग्राहकांअभावी अंड्यांचे दर घसरले