मुंबई : मुख्यमंत्र्यांकडून सत्तेचा गैरवापर करून आम्हाला त्रास दिला जातोय. आमच्यावर एकतर्फी कारवाई होत आहे. रुग्णालयाबाहेर येणाच आमदार रवी राणांनी मुख्यमंत्र्यांवर पुन्हा निशाणा साधला. रवी राणा म्हणाले, आम्ही जेलमध्ये असताना दोन-तीन वेळा आमच्या घरासमोर नोटीस चिपकविणं, हे सुडाचं राजकारण (Politics) आहे. बिल्डिंगला मान्यता दिली आहे. बिल्डरला मान्यता (Recognition of Builder) दिलेली आहे. तेव्हा कित्तेक लोकं त्या बिल्डिंगमध्ये राहतात. महापालिकेवर शिवसेनेची सत्ता आहे. महापौर शिवसेनेचा आहे. मी दोन दिवसांपासून मुंबई महापालिकेच्या (Mumbai Municipal Corporation) कर्मचाऱ्यांची वाट पाहत आहे. या फ्लॅट बघून घ्या. मोजून घ्या. अनेक लोकांनी त्याठिकाणी फ्लॅट घेतले. मीसुद्धा इथं फ्लॅट घेतला. यासाठी महापालिकेनीच परवानगी दिली आहे. इथल्या शिवसेनेच्या महापौरांनीच या बांधकामाला मान्यता दिली आहे. आयुक्तांना या बांधकामाला मान्यता दिली आहे. त्यामुळं ते मान्यता देतात, तेच कारवाईसाठी दबावापोटी पुढाकार घेत आहेत. हे महाराष्ट्रतील संपूर्ण जनता पाहत आहे, असंही राणा म्हणाले.
रवी राणा यांनी सांगितलं की, मला वाटते. संपूर्ण बिल्डिंग तुमच्या डोळ्यासमोर आहे. ही बिल्डिंग 15 वर्षांपूर्वी बिल्डरनं बांधली आहे. बिल्डरकडून आम्ही फ्लॅट घेतला आहे. मी कुठलीही बिल्डिंग बांधली नाही. मी बिल्डर नाही. मी शेतकऱ्याचा मुलगा आहे. सर्वसामान्य परिवारात जन्मलो. एक फ्लॅट मुंबईत खरेदी केला आहे. तो फ्लॅट मुंख्यमंत्री द्वेषाच्या राजकारणातून तोडत असतील, तर मला वाटते. त्यांच्याकडं सत्ता आहे. ते मुख्यमंत्री आहेत. राज्याचे प्रमुख आहेत. ते कुठल्याही प्रकारची कारवाई आमच्यावर करू शकतात.
आम्हाविरोधात खोटा गुन्हा दाखल करून जेलमध्ये टाकू शकतात, तर ते आमचा फ्लॅट काय ते आम्हालाही मारू शकतात, अशी भीती रवी राणा यांनी व्यक्त केली. आमच्यावरही हमला करू शकतात. ते कुठलाही दुरुपयोग करतील. त्यासाठी आम्ही त्यांना सहकार्य करू. या फ्लॅट मोजा जी कारवाई करायची आहे ती करा. खासदार संजय राऊत, मंत्री अनिल परब, मुख्यमंत्री ठाकरे यांची जी-जी चौकशी केंद्रात प्रलंबित आहे. त्याचा दिल्लीत पाठपुरावा आम्ही करणार आहोत. आमच्या न्यायासाठी दिल्लीला मागणी करू. दिल्लीला जाऊन भाजपच्या वरिष्ठ नेत्यांकडं तक्रार करणार, असंही राणा यांनी सांगितलं.