मी बारावीच्या पुढे शिकू शकलो नाही पण…, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उघडले हे रहस्य

| Updated on: Jun 20, 2023 | 9:01 PM

११ महिन्यांपूर्वी राज्याचे मोठे ऑपरेशन केले. संधी मिळेल तेव्हा तेव्हा पुढील शिक्षण घेईल. माणसाकडे जिद्द, चिकाटी पाहिजे. तो नक्कीच पुढे जातो, असंही मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले.

मी बारावीच्या पुढे शिकू शकलो नाही पण..., मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उघडले हे रहस्य
Follow us on

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, मी बारावीच्या पुढे शिकू शकलो नाही. पण, माझ्या मनामध्ये जिद्द होती. मी माझ्या मुलाला डॉक्टर केलं. आर्थोपिडिक सर्जन केलं. पण, त्याच्यासाठी हॉस्पिटल सुरू करून देऊ शकलो नाही. त्याच्या शिक्षणात त्याच्या आईचा मोठा वाटा होता. मी पण शांत राहिलो नाही. यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठातून पदवी घेतली. पुणे विद्यापीठातून एमएचं फस्ट ईअर केलं. लास्ट ईअर करायला गेलो आणि ऑपरेशन २००० आलं. ११ महिन्यांपूर्वी राज्याचे मोठे ऑपरेशन केले. संधी मिळेल तेव्हा तेव्हा पुढील शिक्षण घेईल. माणसाकडे जिद्द, चिकाटी पाहिजे. तो नक्कीच पुढे जातो, असंही मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले.

स्वतःच्या क्षमतांकडे दुर्लक्ष करू नका

मुख्यमंत्री शिंदे यांनी म्हंटलं की, आपल्या प्रत्येकाकडे एक पत आहे. टॅलेंट आहे. आपल्याकडील क्षमतेकडे कुणीही दुर्लक्ष करू नये. स्वतःला कमी समजता कामा नये. आपण समाजात उत्तम काम करू शकतो. स्वतःच्या स्वार्थापेक्षा इतरांच्या जीवनात बदल घडवण्यासाठी काही ना काही करतो. तेव्हा त्यांचा सन्मान होतो.

वारकरी संप्रदाय खरे समाजसुधारक

पाठीवर शाबाशकीची थाप दिली की, लोकं चांगले काम करतात. मार्गदर्शन हवे असते. समाजात चांगले काम करणाऱ्यांची संख्या वाढली म्हणजे समाज सुधारतो. वारकरी संप्रदायाचे लोकं हे समाज सुधारण्यासाठी कीर्तन करत असल्याचंही त्यांनी सांगितलं.

जन्माने नव्हे कर्माने माणूस मोठा

आयुष्यामध्ये पांडुरंगाच्या नामस्मरणाचे वाटप करतात. चागंल्या आयुष्याकडे ते वळवत असतात. आनंद दिघे साहेब सांगायचे की, अर्धा-एक तास का होईना पांडुरंगाचे स्मरण केल्यास चांगले विचार येतात. जन्माने नाही तर माणूस कर्माने मोठा होत असतो. चांगले काम करून जावे, असा सल्ला एकनाथ शिंदे यांनी दिला.

वारकरी नामस्मरण करतात. त्यातून समाजात शांतता निर्माण होते. समाजाची सुधारणा होते. पांडुरंगाचे स्मरण केल्याने चांगले विचार येतात, असंही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.