मुंबईः राज्यातील राजकीय घडामोडींना प्रचंड वेग आला आहे. नुकतीच पदवीधर आणि शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकांचा निकाल लागला आहे. तर दुसरीकडे पुण्यातील कसबा पोटनिवडणुकीमुळे सगळं राजकारण ढवळून निघाले आहे. त्यामुळे आता राजकारणातील परंपरा काय आहे हे सांगत पोटनिवडणुकीत लढाई नको असल्याचे मत खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केले आहे. कसबा पोटनिवडणुकीत उमेदवार न देता ती निवडणूक बिनविरोध करावी अशी मागणही एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केली आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कसबा पोटनिवडणुकीत नेमका काय निर्णय घ्यायचा आहे ते आता त्यांनी घ्यायला पाहिजे असंही त्यांनी यावेळी सांगितले. कसबा पोटनिवडणूक बिनविरोध करावी यासाठी शरद पवार, अजित पवार, आणि राज ठाकरे यांना आपण फोन केल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
एकनाथ शिंदे यांनी या पोटनिवडणुकीविषयी बोलताना सांगितले की, आपल्या महाराष्ट्राची राजकीय परंपरा ही एखाद्या मतदार संघातील आमदार सदस्यांचे निधन झाले,
तर विभागात उमेदवार न देता ती निवडणूक बिनविरोध करण्याची आपल्या राज्याची संस्कृती आहे. त्यामुळे यावेळी कसबा पोटनिवडणूक बिनविरोध करावी अशी मागणी एकनाथ शिंदे यांनी राजकीय पक्षांना केले आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, आमदार अजित पवार, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांना फोन करून एकनाथ शिंदे यांनी ही पोटनिवडणूक बिनविरोध करण्याची मागणी केली आहे.
त्यामुळे कसबा पोटनिवडणुकीविषयी नेत्यांना विनंतीचा फोन करणे हा आमचा अधिकार आहे. तर त्याबाबत कोणता निर्णय घ्यायचा हा अधिकार त्या त्या पक्षातील वरिष्ठ नेत्यांच्या असल्याचे मत एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केले.