मुंबई – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, आरोप करणे सोपे आहे. मला सांगा दोन-तीन महिन्यांत एवढे मोठे प्रकल्प काय इकडे तिकडे जातात का. त्यावर मी बोलणार नाही. त्यांना आरोप करू द्या. आम्ही कामातून उत्तर देऊ. अडीच वर्षे कामे थांबली होती. कामे करण्यासाठी धाडस लागते. आम्ही सरकार आणण्यासाठी धाडस केले. मागच्या सरकारमध्ये बैठका व्हायच्या. तेव्हा मात्र मला बंधने होती. आता मी मुख्यमंत्री आहे. सर्व निर्णय घेऊ शकतो, ते घेत आहोत. मी आणि फडणवीसांनी जेव्हा शपत घेतली तेव्हा ठरवलं, प्रत्येक कॅबिनेटमध्ये जनहिताचे निर्णय घ्यायचं.
111 विद्यार्थ्यांची नियुक्ती राहिली आहेत. त्यासंदर्भात न्यायालयात आपली बाजू भक्कमपणे मांडू. त्यांना न्याय मिळवून देऊ, असे आश्वासन एकनाथ शिंदे यांनी दिले.
आज आपण 1034 जणांना नियुक्तीपत्र देत आहोत. त्या सर्वांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा. प्रतप्रधान यांनी दहा लाख नियुक्तीपत्र देणार असल्याची घोषणा केली. आपण देखील 75 हजार नियुक्ती देणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले.
मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, हे सर्व सामान्यांचे सरकार आहे. बेरोजगार यांच्या हाताला काम द्यायचे आहे. म्हणून ही नियुक्तीपत्र देण्याचा कार्यक्रम आहे. मी काही डिटेलमध्ये जात नाही. पण सरकार म्हणून धाडसी निर्णय घ्यावे लागतात. कॅबिनेटमध्ये अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले जातात, अशी माहिती त्यांनी दिली.
जे 15 प्रकल्प थांबले होते ते देखील आम्ही पुढे ढकलले. नरेंद्र मोदी यांनी 2 लाख कोटी रुपयांचे प्रकल्प मंजूर केले. नगरविकास विभागाचे फक्त पंधरा हजार कोटी प्रकल्प होते. कोण आरोप करतो त्यात मी जात नाही. आरोप करणे सोपे, दोन-तीन महिन्यात मोठे प्रकल्प निघून जातात का? तुम्ही आरोप करा. मी कामातून उत्तर देईन, असंही शिंदे यांनी सांगितलं.