Eknath Shinde : मुख्यमंत्री शिंदे राज्यपालांच्या भेटीला, 12 आमदारांची नवी यादी राज्यपालांना देणार? कुणाचा लागणार नंबर?

| Updated on: Sep 06, 2022 | 6:25 PM

ही 12 नाव कुणाची आहेत,हे पाहणंही तितकंच महत्त्वाच ठरेल. यापूर्वी 12 नावं महाविकास आघाडीनं ठरवून ठेवली होती. त्या नावांना तिलांजली मिळालेली आहे.

Eknath Shinde : मुख्यमंत्री शिंदे राज्यपालांच्या भेटीला, 12 आमदारांची नवी यादी राज्यपालांना देणार? कुणाचा लागणार नंबर?
मुख्यमंत्री शिंदे राज्यपालांच्या भेटीला, 12 आमदारांची नवी यादी राज्यपालांना देणार?
Follow us on

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे राज्यपाल (Governor) भगतसिंह कोश्यारी यांच्या घरीच्या भेटीला गेलेत. विधान परिषदेसाठीच्या 12 आमदारांची नवी यादी मुख्यमंत्री देणार असल्याची चर्चा आहे. यामुळं या भेटीला महत्त्व प्राप्त झालंय. यापूर्वी महाविकास आघाडीनं राज्यपालांना दिलेली यादी रद्द करा, असं पत्र मुख्यमंत्री शिंदे (Chief Minister) यांनी राज्यपालांना पाठविलं होतं. आता मुख्यमंत्री शिंदे हे राज्यपालांच्या भेटीसाठी राजभवनावर पोहचले आहेत. आता मुख्यमंत्री नवीन बारा आमदारांची यादी देतात का,हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. विशेष म्हणजे या यादीत कुणाचा नंबर लागणार हेही पाहावं लागेल. या नावांची यादी अद्याप बाहेर आली नाही. पण, यात कुणाचा समावेश असणार, याची चर्चा सुरू झाली आहे.

12 जणांच्या यादीत कुणाचा नंबर?

विधान परिषदेसाठी काही नामनिर्देशित नावं असतात. सत्ताधारी आपल्या जवळच्या व्यक्तींना विधान परिषदेत आमदार नियुक्त करतात. ही यादी मुख्यमंत्री हे राज्यपालांना देत असतात. राज्यपालांची मान्यता मिळाल्यानंतर या यादीवर शिक्कामोर्तब होते. आमदार म्हणून अशा गणमान्य व्यक्तीची वर्णी लागते. ही 12 नाव कुणाची आहेत,हे पाहणंही तितकंच महत्त्वाच ठरेल. यापूर्वी 12 नावं महाविकास आघाडीनं ठरवून ठेवली होती. त्या नावांना तिलांजली मिळालेली आहे. तसं पत्रचं मुख्यमंत्री यांनी यापूर्वी राज्यपालांना पाठविलं आहे.थोड्याच वेळापूर्वी मुख्यमंत्री शिंदे हे राजभवनात दाखल झाले.भगतसिंह कोश्यारी यांनी गणपती बाप्पाची मूर्ती बसविली आहे. या मूर्तीचं दर्शन घेण्यासाठी मुख्यमंत्री शिंदे आलेले आहेत. परंतु,एकनाथ शिंदे हे नामनिर्देशित 12 आमदारांच्या यादीबाबत चर्चा करणार असल्याची शक्यता आहे.

हे सुद्धा वाचा

महाविकास आघाडीनं दिलेली यादी रद्द

यापूर्वी महाविकास आघाडीनं विधान परिषदेसाठी 12 नामनिर्देशित आमदारांची यादी दिली होती. पण, त्या यादीला राज्यपालांनी मान्यता दिली नव्हती. ती यादी रद्द करावी, अशी मागणी मुख्यमंत्री शिंदे यांनी राज्यपालांना केली. यासंदर्भात त्यांनी तसं पत्र राज्यपालांना दिलं होतं. पण, आता नवीन नाव दिली जाण्याची शक्यता आहे. पण, ही नवीन नामनिर्देशित आमदार कोण असतील. त्यांची यादी आज मुख्यमंत्री हे राज्यपालांकडं देणार का, यासंदर्भात चर्चा सुरू आहे. या 12 नामनिर्देशित आमदारांच्या यादीत शिंदे गटाचे काही नेते तसेच भाजपचे काही महत्त्वाचे चेहरे असतील. ही नावं कोणती आहेत. यात कुणाचा नंबर लागणार, अशी चर्चा सध्या सुरू आहे.