मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लॉकडाऊन 4 च्या पार्श्वभूमीवर आज पुन्हा एकदा राज्यातील जनतेशी संवाद साधला. (CM Uddhav Thackerays appeal) “राज्यात 50 हजार उद्योग सुरु झाले आहेत. परप्रांतिय मजूर गावी गेले आहेत, जर मजुरांचा तुटवडा जाणवत असेल तर महाराष्ट्राला आत्मनिर्भर करण्यासाठी भूमिपुत्रांनी समोर यावं असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलं. तसेच त्यांनी कोरोनाचं हे संकट पावसाळ्यापूर्वी संपवायचं आहे, असा निर्धारही बोलून दाखवला. मात्र त्याचवेळी त्यांनी कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील जनतेला कळकळीची विनंती केली. (CM Uddhav Thackerays appeal)
परराज्यातील मजुरांना त्या त्या राज्यात सुरक्षित पाठवत आहोत, पण महाराष्ट्रातील कामगार, मजूरही आपल्याला कधी पाठवणार अशी विचारणा करत आहेत. कोकण, पश्चिम महाराष्ट्रातील नागरिकांकडूनही विचारणा होत आहे, बाहेरच्यांना पाठवलं आम्हाला कधी पाठवणार? पण तुम्ही तर आमचे आहात, तुम्हालाही पोहोचवू, कृपा करुन तुम्ही चालत जाऊ नका, असं मुख्यमंत्री म्हणाले.
गावी जाण्याची नितांत गरज आहे का? जर तुम्हाला खरचं जायचं का, गरज आहे का? याचा विचार करा. तुम्ही गावी जाण्याऐवजी धीर धरला तर सर्वांसाठी बरं होईल, काही ग्रीन झोनमध्ये मुंबई-पुण्यातून गेलेले लोक पॉझिटिव्ह आढळले, त्यामुळे त्यांच्या सुरक्षेचाही तुम्ही विचार करा, थोडा धीर धरा, असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलं.
मुंबई-पुण्यातून आलेल्यांमुळे डोकेदुखी
दरम्यान मुंबई-पुण्यातून कोकण, पश्चिम महाराष्ट्रासह राज्याच्या कानाकोपऱ्यात जाणाऱ्यांमुळे स्थानिक प्रशासनाची डोकेदुखी वाढत आहे. कारण हे नागरिक गावी गेल्यानंतर तिथे त्यांची टेस्ट केली असता कोरोना पॉझिटिव्ह निघत आहेत. त्यामुळे तिथल्या स्थानिकांनाही त्याचा त्रास होत आहे. रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सातारा, सांगली, बीडसह बहुतेक जिल्ह्यांमध्ये मुंबई-पुण्यातून आलेल्या नागरिकांना कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं आहे.
या सर्व पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांना राज्यातील नागरिकांना, विशेषत: कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील नागरिकांना जिथे आहे तिथेच राहण्याचा, मुंबई-पुणे न सोडण्याचं आवाहन केलं.
(CM Uddhav Thackerays appeal)
मुख्यमंत्र्यांचे महत्त्वाचे मुद्दे
- घरात राहा सुरक्षित राहा हे आतापर्यंत पाळलं, यापुढे घराबाहेरही सावध राहा, हात सतत धुवत राहा, तोंडाला रुमाल, मास्क लावा, हात वारंवार चेहऱ्यावर फिरवू नका, हे आपल्याला पुढील काही महिने पाळावं लागेल – मुख्यमंत्री
- घरात रहा सुरक्षित राहा सोबतच सावध राहा, हात सतत धुवत राहा, तोंडाला शक्यतो हात लावू नका – मुख्यमंत्री
- परदेशातूनही लोक आपण आणत आहोत, मात्र विलगीकरण हे आवश्यक आहे, तुम्हाला काही लक्षण नसली तरी तुम्ही वाहक होऊ नका – मुख्यमंत्री
- तुम्ही गावी जाण्याऐवजी धीर धरला तर सर्वांसाठी बरं होईल, काही ग्रीन झोनमध्ये मुंबई-पुण्यातून गेलेले लोक पॉझिटिव्ह आढळले, त्यामुळे त्यांच्या सुरक्षेचाही तुम्ही विचार करा, थोडा धीर धरा – मुख्यमंत्री
- कोकण, पश्चिम महाराष्ट्रातील नागरिकांकडूनही विचारणा होत आहे, बाहेरच्यांना पाठवलं आम्हाला कधी पाठवणार? पण तुम्ही तर आमचे आहात, तुम्हालाही पोहोचवू, कृपा करुन तुम्ही चालत जाऊ नका – मुख्यमंत्री
- मजूरांकडून तिकीट घेतलेले नाही, मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून खर्च केला आहे. मुंबईत राहणारी पश्चिम महाराष्ट्र, कोकणातील लोकांनाही घरी पाठवणार, पण अस्वस्थ होऊ नका – मुख्यमंत्री
- ज्या मजुरांना पाठवलं, त्या मजुरांकडून तिकीटाचे पैसे घेतले नाहीत, मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून पैसे दिले – मुख्यमंत्री
- जे मजूर रस्त्याने चालत जात आहेत, त्यांनी कृपा करुन तो मार्ग पत्करु नये, तुमच्यासाठी रेल्वे, बसची सुविधा केली आहे, आहे तिथेच थांबा, तुम्हाला पूर्ण सुरक्षितपणे तुमच्या राज्यात पाठवू – मुख्यमंत्री
- इतर राज्यातील मजूर रस्त्यात का चालताय, तुमच्यासाठी आधीच ट्रेनची सोय केली आहे, तुमच्या प्रत्येकासाठी बस, ट्रेनची सोय केली आहे, ते तुमची सोय करत आहेत – मुख्यमंत्री
- मजुरांची आपण काळजी घेतली, 5-6 लाख मजुरांची जेवणा खाणाची सोय केली, त्यांना घरी जायचं होतं, त्यासाठी प्रयत्न केले, जवळपास 5 लाख मजुरांना त्यांच्या त्यांच्या राज्यात पाठवले – मुख्यमंत्री
- मी जर समजा हा लॉकडाऊन उठवला तर इतर देशांसारखे महाराष्ट्राचे होईल – मुख्यमंत्री
- मी महाराष्ट्रासाठी टीकेचा धनी होईन, मात्र मला जे योग्य वाटेल ते ते मी करणारच – मुख्यमंत्री
- लॉकडाऊन जर उठवला तर इटली, ब्राझीलमध्ये जे काही होतंय ते इथे होईल, त्यामुळे लॉकडाऊन हटवणार नाही, माझ्यावर टीका झाली तर होऊदे, महाराष्ट्राच्या भल्यासाठी मी टीका सहन करेन, रेड झोनमध्ये तूर्तास सूट नाही – मुख्यमंत्री
- रुग्णवाहिका, व्हेंटिलेटर्स इतर आरोग्य सोयी सुविधा वाढवत आहे – मुख्यमंत्री
- राज्यभर आरोग्य सुविधा वाढवत आहोत, शक्य ती सर्व पावलं उचलत आहोत – मुख्यमंत्री
- आज मुंबईत आज १९ हजार रुग्ण पॉझिटिव्ह आहे, त्यातील ५ हजार रुग्ण बरे झाले आहेत, दुर्देवाने काहींचा मृत्यू झाला. याचा अर्थ वेळेत आलात तर बरे होता येते – मुख्यमंत्री
- मुंबईत 19 हजार रुग्ण आहेत, मात्र त्यापैकी 5 हजार बरं होऊन घरी परतले आहेत, त्यामुळे बरे होणाऱ्या रुग्णांची संख्याही वाढत आहे – मुख्यमंत्री