झाकलेली मूठ उघडायला लावू नका, नाहीतर पवारसाहेबांना…;चित्रा वाघ यांचं विद्या चव्हाणांना आव्हान

| Updated on: Jul 30, 2024 | 4:28 PM

Chitra Wagh on Vidya Chavan and Sharad Pawar : भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांनी शरद पवार गटाच्या नेत्या विद्या चव्हाण यांना आव्हान दिलं आहे. चित्रा वाघ यांनी पत्रकार परिषद घेत विद्या चव्हाण यांच्यावर गंभीर आरोप केलेत. यावेळी शरद पवार यांचं नावही चित्रा वाघ यांनी घेतलंय. वाचा...

झाकलेली मूठ उघडायला लावू नका, नाहीतर पवारसाहेबांना...;चित्रा वाघ यांचं विद्या चव्हाणांना आव्हान
चित्रा वाघ, विद्या चव्हाण
Image Credit source: Facebook
Follow us on

पत्रकार परिषद घेत राष्ट्रवादीच्या नेत्या विद्या चव्हाण यांनी चित्रा वाघ यांची एक ऑडिओ क्लिप ऐकवली. याचवेळी चित्रा वाघ यांनीही पत्रकार परिषद घेत पलटवार केला आहे.  माझ्यावर अतिशय प्रेम करणाऱ्या विद्या चव्हाण यांची प्रेस ऐकली. कालपासून चित्रा वाघ यांचे कारनामे महाराष्ट्राला सांगणार अशी सनसनाटी निर्माण केली. त्या काही चांगल बोलतील अशी अपेक्षा नाही. मागे देखील वेगवेगळ्या बायका बसवून मी कशी वाईट आहे हे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे हे केलंय. आता बऱ्याच दिवसांनी विद्या चव्हाण यांचे दर्शन टीव्ही चॅनलवर दिसलं, यासाठी त्यांनी माझे आभार मानावेत, असं चित्रा वाघ म्हणाल्यात. झाकलेली मूठ उघडायला लावू नका, नाहीतर पवारसाहेबांना त्रास होईल, असंही त्या म्हणाल्या.

“नाहीतर साहेबांना त्रास होईल”

मागे मी सरकारी वकील प्रवीण चव्हाण यांच्याबद्दल जे बोलले होते. प्रवीण चव्हाण यांनी जे जे बोलले ते विधानसभेच्या सभागृहाच्या पटलावर देवेंद्र फडणवीस यांनी मान्य केलं आहे. तुम्ही म्हणालात की चित्र वाघला आम्ही मोठं केलं… त्या भानगडीत मी जात नाही. मात्र तुम्ही हात दिला आणि मी डोळे झाकून चाललेलं का? पायाचं कातडं निघेपर्यंत मी माझी जबाबदारी पार पाडली. पक्षाने दिलेली जबाबदारी मी पूर्ण केली. चित्रा वाघमध्ये काहीतरी क्वालिटी आहे. म्हणून मी काम केलं. भाजपने मला काही पद दिले का? कोणाला विचारावे, शेवटचं महिला आयोगाची सदस्य फक्त मी होते. माझी मूठ झाकलेली आहे, ती उघडायला लावू नका, नाहीतर शरद पवारसाहेबांना त्रास होईल, असं चित्रा वाघ म्हणाल्या आहेत.

देवेंद्र फडणवीस, मोदींबाबत बोलताना हा शहाणपणा कुठे जातो. तुम्ही जे पेराल तेच उगवेल. तुम्ही जो पेन ड्राईव्हचा आवाज ऐकवला आहे. आम्ही तर अनिल देशमुख यांच्या पेन ड्राईव्हची अपेक्षा करत होतो, असं चित्रा वाघ म्हणाल्या आहेत. सुप्रियाताई सुळेंनी ४-५ बायका माझ्याबाबत वाईट बोलायला बसवल्या. हमे तो इंतजार है विद्या चव्हाण यांच्या पेन ड्राईव्हचा नाही…. हमे इंतजार है अनिल देशमुख यांच्या पेनड्राईवचा… तुम्हाला सांगते तीन तासात तुमच्या सगळ्या क्लिप बाहेर काढणार आहे, असं चित्रा वाघ म्हणाल्या आहेत.

गँगला आवरा- वाघ

मला सगळ्यांना सांगायचं आहे, पवार साहेब, मोठ्या सुप्रिया ताई, या तुमच्या गँगला आवरा… तुम्हाला वाटत असेल की याने चित्रावर दबाव येईल. तर तसं होणार नाही. 20 वर्ष तुमच्या पक्षात होते, तुमच्यावर बापासारखं प्रेम केलं? तुम्ही काय केलं ? माझ्या परिवाराला गोत्यात अनल, मी सहन केलं. आता ही बाई आणली. पण चित्रा वाघ घाबरणार नाही, असंही त्यांनी म्हटलंय.