नागपूरमध्ये काल हिंसाचार उसळला. संध्याकाळी अचानक एक गट आक्रमक झाला. या गटाने एका परिसराला टार्गेट केले. त्यानंतर विरोधकांसह सरकारला धारेवर धरले. याप्रकरणात अर्थसंकल्पीय अधिवेशनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दंगेखोरांना सज्जड दम भरला आहे. कुणी दंगा केला अथवा पोलिसांवर हल्ला केला तर तो कोणत्याही जाती, धर्माचा असला तरी त्याला सोडणार नाही, असा इशारा मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिला.
मुख्यमंत्र्यांनी असा सांगितला हिसेंचा घटनाक्रम
काल सकाळी 11. 30 वाजता विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दल यांनी औरंगजेब कबर हटाव यासाठी आंदोलन केले. कार्यकर्त्यांनी औरंगजेबाची कबर हटाव असे नारे देत आंदोलन केले. हे आंदोलन करताना त्यांनी गवताच्या पेंढ्या असलेली प्रतिमात्मक कबर त्या ठिकाणी जाळली. यानंतर गणेश पेठ पोलिसांनी आंदोलकांवर अपराध क्रमांक 114-2025 नुसार भारतीय न्याय संहिता 299, 37 एक व तीन सह एक 135 महाराष्ट्र पोलीस कायदा नवे गुन्हा दाखल केला. दुपारी तीन वाजून नऊ मिनिटांनी हा गुन्हा दाखल झाला.
एक अफवा आणि जमाव हिंसक
यानंतर सायंकाळी एक अफवा अशी पसरवली गेली की सकाळच्या आंदोलनात जी प्रतीकात्मक कबर झाली त्याच्या कापडावर धार्मिक मजकूर होता. अत्तर रोड मधील नमाज आटोपून 200 ते 250 चा जमाव हा त्या ठिकाणी आला आणि नारे देऊ लागला. यास लोकांनी आग लावून टाकू असे हिंसक बोलणे प्रारंभ केल्याने पोलिसांनी त्याठिकाणी बळाचा वापर केला. यापूर्वी बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांविरुद्ध तक्रार द्यायची आहे अशी मागणी करण्यात आल्याने त्यांना गणेश पेठ पोलीस ठाण्यामध्ये आमंत्रित करण्यात आलं. त्यांची तक्रार एकूण घेण्यात आली, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केले.
एक जण आयसीयूत, सध्या संचारबंदी
एकीकडे पोलिसांची कारवाई सुरू असताना दुसरीकडे हंसापुरी भागांमध्ये 200 ते 300 लोक हातात काठ्या घेऊन दगडफेक करू लागले त्यांच्या तोंडावर फडके बांधले होते. या घटनेत 12 दुचाकींचे नुकसान झाले आहे. या घटनेमध्ये काही लोकांवर घातक शास्त्राने हल्ला करण्यात आलेला आहे. तिसरी घटना भालदार पुरा भागात सायंकाळी साडेसात वाजता झाली. 80 ते 100 लोकांचा जमाव तिथे होता. तिथे त्यांनी पोलिसांवर हल्ला केला, त्यामुळे अश्रुधूर व सौम्य बाळाचा वापर करावा लागला. या घटनेत दोन जेसीबी व काही चार चाकी वाहने ही जाळण्यात आली.
या संपूर्ण घटनेमध्ये 33 पोलीस जखमी झाले आहेत ज्यामध्ये तीन उपायुक्त दर्जाचे पोलीस आहेत त्यातल्या एका पोलीस उपायुक्त वर पुराने त्या ठिकाणी हल्ला करण्यात आलेला आहे. एकूण पाच नागरिक जखमी झालेले आहेत. तिघांना उपचार करून सोडल्या दोन रुग्णालयात आहेत. एकूण तीन गुन्हे गणेश पेठ पोलीस ठाण्यात दाखल झाले आहेत. तहसील पोलीस ठाण्यात दोन गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे असे एकूण पाच गुन्हे दाखल करण्यात आल्याचे मुख्यमंत्र्यांनी सभागृहात सांगितले.
सध्या 11 पोलीस ठाण्याच्या हद्दीत संचारबंदी लागू करण्यात आलेली आहे एन्ट्री पॉइंटवर नाकाबंदी करण्यात आली आहे. तर तहसील, कोतवाली, गणेश पेठ, पाचपावली, लकडगंज शांतीनगर, शक्करदर्गा, नंदनवन, इमामवाडा, यशोधरा नगर, कपिल नगर या ठाण्यांचा संचारबंदीत समावेश आहे एसआरपीएफ च्या पाच तुकड्या या ठिकाणी तैनात करण्यात आलेले आहेत असे कथन मुख्यमंत्री फडणवीस यांनी सभागृहात केले.
दंगेखोरांना सोडणार नाही
गाडी भरून दगड गोळा करून ठेवले होते. ठरवून काही आस्थापना व घरांना टार्गेट करण्यात आल्याचे मुख्यमंत्र्यांनी सभागृहाला सांगितले. तीन डीसीपी स्तरावरील पोलीस अधिकार्यांवर हल्ले करण्यात आले. एका डीसीपीवर तर कुऱ्हाडीने वार केला आहे. पोलिसांवर ज्यांनी हल्ला केला असेल त्याला काही झाले तरी सोडणार नाही, असा इशारा मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिला. कुणी दंगा करत असेल तर त्याच्यावर जात, धर्म न बघता कारवाई करण्यात येईल असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. कायदा व सुव्यवस्था राखण्याची सर्वांची जबाबदारी आहे, अशी विनंती त्यांनी जनतेला केली. सर्व समाजाचे धार्मिक सण या कालावधीत सुरू आहेत. सर्वांनी संयम ठेवला पाहिजे एकमेकांप्रती आदरभाव ठेवावा असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.