मुंबईः गेल्या दोन वर्षापासून कोविडच्या (Covid) काळात निर्बंधामुळे सण उत्सव साजरे करण्यावर निर्बंध लादण्यात आले होते, मात्र यावर्षीचे पुढचे सण निर्बंधमुक्त असणार असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केले. यावेळी त्यांनी गणेशोत्सव (Ganesh Chathurthi), दहीअंडी (Dahihandi) आणि मोहरम (Moharam) मोठ्या उत्साहात साजरे करण्याच्या सूचना दिल्या असल्या तरी त्याचवेळी कायदा आणि प्रशासनाचे नियम पाळून सण साजरे करा असेही त्यांनी सांगितले. यावेळी मुख्यमंत्र्यासोबत उपमुख्यंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही गणेशविसर्जन आणि दहीअंडीबाबत या बैठकीत घेतलेले निर्णयही त्यांनी यावेळी सांगितले.
राज्यातील सण निर्बंधमुक्त करण्यात येत असून राज्यात गणेशात्सव, दहीअंडी आणि मोहरम हे सण निर्बंधमुक्त असणार आहेत. कोविडच्या काळात सण समारंभ साजरे करता आले नसल्याने यावेळी शिंदे-फडणवीस सरकारने हे कोरोना काळातील नियम हटवून पुढील सण निर्बंधमुक्त होणार असल्याचेही त्यांनी सांगितले. यावेळी गणेश चतुर्थीसाठी एसटी प्रशासनाला जादा बस सोडण्याचे निर्देशही यावेळी देण्यात आले आहेत.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी सांगितले की, कायदा सुव्यवस्था राखून सण उत्सव साजरे करा. अशा सूचना जिल्हा प्रशासनाला देण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले. यावेळी मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, आगमन आणि विसर्जन मार्गावरच्या रस्त्यावरच्या खड्डे दुरुस्त करण्याचे आदेशही प्रशासनाला दिले आहेत.
गणेशोत्सवासाठी घालण्यात येणारे मंडपवाल्यांसाठी शिंदे-फडणवीस सरकारने महत्वाचे निर्णय घेतले आहेत. मंडवाल्यांना परवानगीसाठी सतत खेटे घालावे लागू नयेत त्यासाठी एक खिडकी योजना चालू करण्याची सुचनाही देण्यात आली आहे. यावेळी एकनाथ शिंदे यांनी सांगितले की, क्लिष्ट अटी व शर्ती असू नयेत यासाठी एक खिडकी योजनेचे निर्देश देण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले. तसेच या बैठकीत मंडळाना नोंदणी शुल्क भरावे लागू नये यासाठी सवलत आणि सूट देण्यात आली आहे. उत्सावासाठी हमी पत्र घेण्याचीही गरज नाही असंही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
गणेशोत्सवासाठी सामाजिक बांधिलकी, आणि नियमांचे पालन केले पाहिजे असे सांगत त्यांनी सांगितले की, मुंबईतील नियमवली राज्यभरात लागू करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. या गणेशोत्सवामध्ये मूर्तीवरील उंचीची मर्यादा घालवण्यात आली आहे. हो उत्सव साजरा होत असताना अधिकाऱ्यांनी सकारात्मक भूमिका घ्यावी तसेच गणेशोत्सवाच्या विसर्जन घाटावर प्रकाशदिव्यांची व्यवस्था करा असेही त्यांनी सांगितले.