मुंबई : एसटी कामगारांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर आलीय. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे एसटी कामागारांबद्दल मोठा निर्णय घेण्याची शक्यता आहे. कारण मुख्यमंत्र्यांनी एसटी कामगारांच्या मागण्यांच्या पार्श्वभूमीवर उद्या महत्त्वपूर्ण बैठक बोलावली आहे. या बैठकीत एसटी कामगारांच्या मागण्यांविषयी महत्त्वाचे निर्णय घेतले जाण्याची शक्यता आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एसटी कामगारांची बैठक बोलावलीय. मुंबईतील सह्याद्री अतिथीगृहावर उद्या ही बैठक पार पडणार आहे.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, एसटी कामगारांसाठी मोठा निर्णय उद्या घेतला जाण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठकीला एसटी कामगारांचे आयुक्त शेखर चेन्ने हे उपस्थित राहणार आहेत.
संबंधित बैठकीत एसटी कामगारांच्या DA च्या संदर्भात महत्त्वाचा निर्णय होण्याची शक्यता आहे. तसेच या बैठकीत एसटी कामगारांच्या 16 मागण्यांवर उद्या तोडगा निघण्याची शक्यता आहे.
दुसरीकडे या बैठकीत डिझेल गाड्या महाराष्ट्रात वाढवण्यासाठी परवानगी अहवाल सादर केले जाणार असल्याची देखील माहिती आहे.
एसटी कामगारांनी काही दिवसांपूर्वी ऐन दिवाळीत संप पुकारल्यामुळे नागरिकांची प्रचंड गैरसोय झाली होती. एसटी कामगारांचा हा संप तब्बल दोन महिन्यांपेक्षा जास्त काळ चालला होता.
या संपामुळे महाराष्ट्रातील शेकडो गावांचा तालुक्याशी असलेला संपर्क तुटला होता. नागरिकांना प्रचंड तासाला सामोरं जावं लागलं होतं. ठाकरे सरकारने एसटी कामागारांच्या मागण्या मान्य केल्या होत्या.