“महाविकास आघाडीची ही वज्रमूठ नव्हे तर वज्रझूठ सभा”; मुख्यमंत्र्यांनी एकाच वाक्यात ‘मविआ’च्या सभेचा समाचार घेतला

| Updated on: Apr 02, 2023 | 6:44 PM

सावरकरांचा अवमान करणाऱ्यांच्याच मांडीला मांडी लावून हिंदुत्व सांगणारे बसतात. त्यामुळे महाविकास आघाडीची आजची सभा होत असली तरी ती वज्रमूठ नव्हे वज्रझूठ आहे अशी टाकी त्यांनी महाविकास आघाडीच्या वज्रमूठ या सभेवर केली आहे.

महाविकास आघाडीची ही वज्रमूठ नव्हे तर वज्रझूठ सभा; मुख्यमंत्र्यांनी एकाच वाक्यात मविआच्या सभेचा समाचार घेतला
Follow us on

मुंबई : काँग्रेसच्या राहुल गांधी यांनी राहुल गांधी यांचा सातत्याने अवमान केला तरीही त्यांच्या मांडीला मांडी लावून बसणाऱ्यांकडून हिंदुत्वाची काय अपेक्षा करणार असा टोला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांना लगावला आहे. महाविकासा आघाडीची वज्रमूठ सभा आज औरंगाबादमध्ये होत आहे. त्यावरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. यावेळी त्यांनी हिंदुत्वासाठी आणि प्रभूरामचंद्र हा आमच्या आस्थेचा विषय असल्याने शिवसेनेचे नेते 9 एप्रिल रोजी अयोध्येला जाऊन आरती करणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले की, बाळासाहेब ठाकरे यांचे विचार पुढं घेऊन जाण्यासाठी आम्ही एकत्र आलो आहे. त्यासाठीच आम्ही अयोध्य दौराही करणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज पत्रकार परिषद घेत असताना त्यांनी पुन्हा एकदा शिवसेना आणि धनु्ष्यबाणाच्या विषयावरून ठाकरे गटाला त्यांनी छेडले आहे.

यावेळी ते म्हणाले की, आमच्या शिवसेनेला जे शिवधनु्ष्य मिळाले आहे. ते शिवधनु्ष्य हे प्रभूरामचंद्र यांचेच आहे. ते पेलण्यासाठी आमच्यामध्ये ताकद आहे असंही त्यांनी यावेळी सांगितले.

आजच्या सभेवरून उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करताना त्यांनी राहुल गांधीय यांनी सावरकर यांचा केलेला अपमानाची त्यांना आठवण करून दिली. ज्या लोकांनी सावरकरांचा अपमान केला आहे. त्यांच्यासोबत जाणाऱ्यांकडून हिंदुत्वाचा कसला आदर्श घेणार असं नाव न घेता त्यांना उद्धव ठाकरे यांना लगावला आहे.

सावरकरांचा अवमान करणाऱ्यांच्याच मांडीला मांडी लावून हिंदुत्व सांगणारे बसतात. त्यामुळे महाविकास आघाडीची आजची सभा होत असली तरी ती वज्रमूठ नव्हे वज्रझूठ आहे अशी टाकी त्यांनी महाविकास आघाडीच्या वज्रमूठ या सभेवर केली आहे. सत्तेसाठी जी लोकं हाफापली आहेत ती लोकं लोकं एकत्र आली आहेत असा टोलाही त्यांनी महाविकास आघाडीच्या वज्रमूठ सभेला लगावला आहे.