मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत भांडुपमध्ये महायुती कार्यकर्ता संवाद मेळावा झाला. महायुती उमेदवार मिहिर कोटेजा यांच्या प्रचारार्थ कार्यकर्ता संवाद मेळावा आयोजित करण्यात आला होता. भांडुपला या मेळाव्याच आयोजन करण्यात आलं होतं. कार्यकर्ता मेळाव्याला मिहिर कोटेचा, माजी खासदार मनोज कोटक, किरीट सोमय्या, आमदार राम कदम, मनीषा कायंदे हे नेते या कार्यकर्ता संवाद मेळाव्याला उपस्थित होते. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेल्या वक्तव्याची चर्चा होतेय. मी पहाटेपर्यंत काम करतो. त्यानंतर पहाटे अजितदादा येतात. मग देवेंद्र फडणवीस असतात. आमचं कामाचं चक्री सुरूच असतं, असं एकनाथ शिंदे म्हणाले.
आता महापालिकेची निवडणूक येत आहे. त्यामुळे त्या भागातून मतदान झालं तर नगरसेवकाला तिकीट मिळणार आहे. कारण तो निवडून येऊच शकत नाही ना जर मतदान झालं नाही तर… आमदारांच्यावर तोच विषय आहे. वर दोनजण बसले आहेत. मी ठाण्याच्या बैठकीत देखील सांगितलं आहे. नगरसेवकाने लीड दिला तरच त्याला तिकीट दिलं जाईल. कार्यकर्त्यांनी पण देखील काम केले तर ठीक नाहीतर त्यांचे पद काढून घेऊन त्यांच्यावर कारवाई करू. आपल्याला एक एक मत महत्त्वाचे त्यासाठी काम करा, अशी तंबी एकनाथ शिंदे यांनी दिली.
आजचा मेळावा ही प्रमुख कार्यकर्ते यांची बैठक आहे. मी महाराष्ट्रात अनेक मतदारसंघात आहेत. उद्या तिसरा टप्पा आहे. एक चांगलं वातावरण आपण पाहतोय. पाहिलं टप्पा आणि दुसरा टप्पा झाला. त्यात मेजोरिटी सीट महायुतीला मिळणार आहेत. मोदींनी मागील १० वर्षात केलेलं काम समोर आहेत. आम्ही गेल्या २ वर्षात केलेलं काम समोर आहे, असं एकनाथ शिंदे म्हणालेत.
आपल्याकडे नेता आहे. नियत आहे. देण्या घेण्याची क्षमता आहे. मात्र समोर नेता देखील निवडू शकले नाहीत. सर्व एक एक वर्ष वाटून घेऊ म्हणतात. मोदींनी जगावर जादू केलीय. मी जेव्हा विदेशात जातो. मी विदेशात फिरायला जात नाही. थंड हवा खायला नाही जात. दावोसला गेलो होतो, उद्योग धंदे चे MOU साईन झाले. आपल्या सरकारने पॉलिसी बदलली, आहे उद्योगांना सोयी सुविधा देत आहोत, असंही एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे.