मविआचं जोडे मारो आंदोलन, मुख्यमंत्री शिंदेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले यांना दंगली…

| Updated on: Sep 01, 2024 | 12:49 PM

CM Eknath Shinde on MVA Jodo Maro andolan : मुंबईतील हुतात्मा चौक ते गेट वे ऑफ इंडिया या परिसरात महाविकास आघाडीने मोर्चा काढला. जोडे मारो आंदोलन झालं. या आंदोलनावर मुख्यमंत्री शिंदेंनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. मुख्यमंत्री शिंदे म्हणाले यांना दंगली...

मविआचं जोडे मारो आंदोलन, मुख्यमंत्री शिंदेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले यांना दंगली...
एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री महाराष्ट्र
Image Credit source: Facebook
Follow us on

राजकोट किल्ल्यावर असणारा छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळल्यानंतर महाविकास आघाडी आक्रमक झाली आहे. मुंबईतील हुतात्मा स्मारक ते गेट वे ऑफ इंडिया असा मोर्चा महाविकास आघाडीने काढला. शरद पवार, उद्धव ठाकरे, नाना पटोले, छत्रपती शाहू महाराज यांच्या नेतृत्वात हा मोर्चा काढला गेला. यावेळी गेट वे ऑफ इंडिया परिसरात सरकारला जोडे मारो आंदोलन महाविकास आघाडीने केलं. यावेळी सरकारवर जोरदार टीका करण्यात आली आहे. या आंदोलनावर मुख्यंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. महाविकास आघाडी महाराष्ट्रात दंगलीची भाषा करत असल्याचं शिंदेंनी म्हटलं आहे.

मुख्यमंत्री शिंदेंची पहिली प्रतिक्रिया

विरोधक दंगलीच्या भाषा करत होते. त्यांना महाराष्ट्र अशांत करायचा आहे. त्यांना महाराष्ट्र शांत नकोय. महाराष्ट्रात दंगली व्हाव्यात जातीजातीत तेढ व्हावी असा प्रयत्न त्यांनी लोकसभेपूर्वीही केला होता. पण राज्यातील जनता संयमी आहे, सूज्ञ आहे म्हणून राज्य सरकारही कायदा सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी काम करत आहे. विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. त्यांना पराभव दिसत आहे. लोकसभेत खोटं नरेटिव्ह पसरवून आरक्षण जाणार, संविधान बदलणा… हे होणार ते होणार सांगून लोकांमध्ये भीती पसरवून मते मिळवली. पण माणूस एकदा फसतो. पुन्हा पुन्हा फसत नाही, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.

महाविकास आघाडीवर निशाणा

महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये लेकीबाळी सुरक्षित होत्या का. नवनीत राणांना जेलमध्ये टाकलं. कंगना राणावतचं घर तोडलं. किती महिलांवर अन्याय केला महाविकास आघाडी सरकारमध्ये. यांना शिवाजी महाराजांचं नाव घेण्याचा किती अधिकार पोहोचतो माहीत नाही. पण महाराजांच्या नावाने राजकारण करू नये, असा गंभीर आरोप मुख्यमंत्री शिंदे यांनी महाविकास आघाडीवर केला आहे.

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुपरहीट झाली आहे. गावागावात शहराशहरात खेड्यापाड्यावर मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना पोहोचली आहे. दुर्देव बघा. काँग्रेसचा माणूस अनिल वडपल्लीवार कोर्टात आडवा झालाय. तो कुणाचा कार्यकर्ता आहे. कुणाचा पोलिंग एजंट आहे. काँग्रेस आणि आघाडीने हायकोर्टातही याचिका केली. ती फेटाळली. आता नागपूरला याचिका केली आहे. पण ही यशस्वी योजना आहे. विरोधक काहीही बोलले तरी लोकांना ही योजना पटली आहे, असं शिंदेंनी म्हटलं.