मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राबवली स्वच्छता मोहिम, इस्काॅन मंदिराला दिली भेट
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मुंबईत स्वच्छता मोहिम राबत आहेत. मुंबईतील जुहू चौपाटी येथे त्यांनी स्वच्छता केली. जुहू स्थित इस्काॅन मंदिरात त्यांनी भेट दिली आणि राधा कृष्णाचे दर्शन घेतले. मंदिर प्रशासनाने त्यांचे स्वागत केले.
1 / 6
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जुहू इस्कॉन मंदिरात राधे कृष्णाचे दर्शन घेतले. मंदिर प्रशासनाकडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे ग्रंथ देऊन स्वागत सत्कार करण्यात आले.
2 / 6
इस्कॉन स्वतः चांगला उपक्रम राबवते असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. अन्नदान, परियावरण, तरुण मार्गदर्शन सह पालिकेच्यासोबत मिळून रुग्णालय व शाळेत अन्नदान करण्याचे मोठं काम मंदिर प्रशासन करते असं मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.
3 / 6
आज स्वच्छता मोहीमेमध्ये आपल्याला ही सहभागी करून घेणार आहोत, स्वच्छता मोहीम ही चळवळ म्हणून मी व्यक्तीशा लक्ष देतोय असं मुख्यमंत्री म्हणाले.
4 / 6
मुंबईचा सफाईचा हिरो हा सफाई कर्मचारी आहे. मी आव्हान केल्यानंतर एकदाच लवकर येऊन ते काम करतात. आम्ही कोणाच्या टिकांकडे लक्ष देत नाही. आम्ही आमचं काम करत राहतो असं मुख्यमंत्री म्हणाले.
5 / 6
मुंबईला स्वच्छ करण्यासाठी अद्यावत प्रणालीची मशीन आणण्यात आली आहे. ज्यामध्ये विशेतः चौपाटीवरील कचरा स्वच्छ केला जाणार आहे. मी स्वतः ती चालवून पाहिली असं मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितलं.
6 / 6
स्लम परिसरातसुद्धा आम्ही स्वच्छता राबवत आहोत. धारावीमध्ये सार्वजनीक स्वच्छतागृहे आणि इतर परिसर आम्ही स्वच्छ केला असल्याचे मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.