मुंबई : आम्ही मजबूर नाही तर मजबूत आहोत, हा संदेश आपण (All Party Meet About India-China Face Off ) चीनला दिला पाहिजे. अशा संकटसमयी महाराष्ट्र सरकार हे आपल्या आणि सीमेवरील जवानांच्या पाठीशी ठामपणे उभे राहील, असं आश्वासन राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सर्वपक्षीय बैठकीत दिलं (All Party Meet About India-China Face Off ).
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (19 जून) व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे बोलाविलेल्या सर्वपक्षीय बैठकीत मुख्यमंत्रीही सहभागी झाले होते. पंतप्रधानांना धन्यवाद देऊन मुख्यमंत्री म्हणाले, यावेळी आपण जो संवाद साधला आहे ही प्रक्रिया अशीच सुरु राहावी. आम्ही आमच्याकडून या प्रश्नी आवश्यक ते सर्व सहकार्य निश्चितपणे करु.
“असा गैरसमज जाणीवपूर्वक पसरविण्यात आला आहे की हिंदुस्थान चीन पेक्षा कमजोर आहे, पण ही आता जुनी गोष्ट झाली. आमच्याकडेही सगळ्या शक्ती आहेत. पण आपण कुणावर हल्ले करण्यासाठी उतावीळ नाहीत. आमचा भर नेहमी मुत्सद्देगिरी, चर्चा आणि संवादावर राहील पण याचा गैरफायदा कुणी घेणार असेल तर आपण आपली ताकद दाखवून दिली पाहिजे”, असं मुख्यमंत्री म्हणाले.
“कोरोनाच्या काळात संधीचा फायदा घेऊन चीन दबाव तंत्र खेळत आहे. आधीच कोरोना विषाणू साथीसाठी चीन जबाबदार आहे अशी संपूर्ण जगाची भूमिका असताना स्वत:चा आत्मविश्वास वाढवा म्हणून चीन अशाही परिस्थितीत भांडण उकरुन काढत आहे. त्यामुळे हे दबाव तंत्र झुगारुन देणे गरजेचे आहे”, असं मुख्यमंत्री या बैठकीत म्हणाले (All Party Meet About India-China Face Off ).
PM Narendra Modi | एक इंच जमीनवरही चीनचा कब्जा नाही, सैन्याला सर्व सूट, आमच्याकडेही Fighter Planes : मोदींनी ठणकावलंhttps://t.co/gzqOQ9s8ds #PMOfIndia #China @PMOIndia
— TV9 Marathi (@TV9Marathi) June 19, 2020
संबंधित बातम्या :
चीनचा पूर्व लडाखवर डोळा, ‘तो’ रस्ता भारतासाठी महत्त्वाचा, शरद पवारांचा मोदींना सल्ला
इकडे मोदींची सर्वपक्षीय बैठक, तिकडे हवाई दलप्रमुख लेहमध्ये दाखल, मिराज आणि सुखोई विमानं सज्ज