मुंबई : “मुंबईतील गर्दी कमी होतना दिसत नाही. काही ट्रेनमध्ये गर्दी आहे (Mumbai local lock down). त्यामुळे मोठे पाऊल उचलावे लागणार आहे. मुख्यमंत्री दुपारी साडेबारा वाजता सांगतील”, अशी माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली. मुंबईत पत्रकार परिषद घेऊन आरोग्य मंत्र्यांनी कोरोनाबाबतची (Mumbai local lock down) आजची अपडेट माहिती दिली. देशभरात कोरोना रुग्णांमध्ये वाढ होत आहे. कोरोनाचा प्रादुर्भवा रोखण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारकडून अनेक प्रयत्न केले जात आहे. याच पार्श्वभूमीवर आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी मुंबईतील सार्वजनिक वाहतूक बंद करण्याबाबत मोठे संकेत दिले आहेत.
“मुंबईची गर्दी कमी होताना दिसत नाही. काही लोकल ट्रेनमध्ये गर्दी दिसत आहे. तसेच बेस्ट बसेमध्येही गर्दी दिसत आहे. ज्या पद्धतीने गर्दी कमी होताना दिसली पाहिजे ती दिसत नाही. त्यामुळे अजून आणखी कडक निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे घेणार आहेत. ते आज 12.30 वाजता फेसबुक लाईव्हद्वारे सर्वांशी संवाद साधणार आहेत. तेव्हा तेअधिक माहिती देतील”, असं राजेश टोपे यांनी सांगितले.
महाराष्ट्रात सर्वाधिक रुग्णांची संख्या असल्याने मुंबई, ठाणे आणि पुणे या ठिकाणी जास्त कडक निर्णय घेण्याची गरज आहे. येथे अत्यावश्यक सेवा वगळता इतर सेवेवरमुख्यमंत्री महत्वाचे निर्णय घेतील, असं राजेश टोपे यांनी सांगितलं.
महाराष्ट्रातील संख्या 52 वर
महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांची संख्या 49 वरुन 52 वर पोहोचली आहे. आणखी तीन रुग्ण पॉझिटिव्ह आढळल्याने कोरोनाबाधितांचा आकडा 52 वर पोहोचला आहे. मुंबईत 1, पुणे 1 आणि पिंपरी चिंचवडमध्ये 1 रुग्ण पॉझिटिव्ह आढळल्याची माहिती, आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली.
दिलासादायक म्हणजे 5 रुग्ण जे रुग्णालयात अडमिट होते त्यांची प्रकृती सुधारली असून, लवकरच त्यांना डिस्चार्ज दिला जाईल, अशी माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली. मुंबईत पत्रकार परिषद घेऊन आरोग्य मंत्र्यांनी कोरोनाबाबतची आजची अपडेट माहिती दिली.
संबंधित बातम्या
Corona | महाराष्ट्रात सर्वात मोठा आशेचा किरण, 5 रुग्ण डिस्चार्जच्या मार्गावर, रुग्णांची संख्या 52 वर