मुंबई : महाराष्ट्रातील लॉकडाऊन 31 मे पर्यंत वाढवण्यात (CM Uddhav Thackeray On Lockdown-4.0) आला. आजपासून लॉकडाऊन 4 ची सुरुवात झाली आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनतेशी संवाद साधला. यावेळी मुख्यमंत्र्यांनी राज्यातील ग्रीन झोनमधील तरुणांना कामासाठी पुढे येण्याचं आवाहन केलं. लॉकडाऊनमुळे परराज्यातील मजूर त्यांच्या त्यांच्या गावी गेले आहेत. त्यामुळे ग्रीन झोनमध्ये मजूर कमी पडले तर तिथे मला भूमिपुत्रांची गरज आहे. त्यामुळे महाराष्ट्राला पुन्हा एकदा उभं करण्यासाठी राज्यातील तरुणांनी स्वत: आत्मविश्वासाने पुढे यावं, असं मुख्यमंत्री म्हणाले (CM Uddhav Thackeray On Lockdown-4.0).
तसेच, मुंबई-पुण्याहून कोकणात जाणाऱ्या नागरिकांनी अधीर होऊ नये, अशी विनंती मुख्यमंत्र्यांनी केली आहे. मुंबई-पुण्याहून कोकणात गेलेले नागरिक तेथे कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले. त्यामुळे संसर्ग वाढण्याची भीती आहे. म्हणून नागरिकांनी थोडा धीर धरावा, सरकार तुम्हालाही घरी पाठवेल, असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.
याशिवाय, यंदाचं शैक्षणिक वर्ष वाया जाऊ द्यायचं नाही, त्यामुळे हे कोरोनाचं संकट जून महिन्यापूर्वी संपवायचं आहे, असंही मुख्यमंत्री म्हणाले. तसेच, महाराष्ट्रातील जनतेने आतापर्यंत जसं सहकार्य केलं, तसं यापुढेही करतील, अशी आशा मुख्यमंत्र्यांनी वर्तवली आहे.
CM Uddhav Thackeray Live Updates
LIVE : आतापर्यंत जसं सहकार्य केलं तस यापुढेही कराल याची आशा बाळगतो – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे https://t.co/ImprYhMJl7 #CMUddhavThackeray pic.twitter.com/3KqTt5Td6T
— TV9 Marathi (@TV9Marathi) May 18, 2020
LIVETV – शैक्षणिक वर्ष वाया जाऊ द्यायचं नाही, अॅडमिशन, निकाल आहेत, हे संकट आपल्याला पावसाळ्यापूर्वी संपवायचं आहे – मुख्यमंत्री https://t.co/ImprYhMJl7 @CMOMaharashtra pic.twitter.com/jWQgFDrJTD
— TV9 Marathi (@TV9Marathi) May 18, 2020
LIVE : परदेशातील लोक परत येतात, आपल्याकडील अडकलेली लोक परत जात आहेत – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे https://t.co/ImprYhMJl7 #CMUddhavThackeray pic.twitter.com/OfMMJ9sr79
— TV9 Marathi (@TV9Marathi) May 18, 2020
LIVE : कोकण, पश्चिम महाराष्ट्रातील लोकांनी कृपया तुम्ही तरी चालत जाऊ नका, जर तुम्हाला खरचं जायचं का, गरज आहे का? याचा विचार करा – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे https://t.co/ImprYhMJl7 #CMUddhavThackeray pic.twitter.com/M8Z3GDcA4E
— TV9 Marathi (@TV9Marathi) May 18, 2020
LIVETV – ज्या मजुरांना पाठवलं, त्या मजुरांकडून तिकीटाचे पैसे घेतले नाहीत, मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून पैसे दिले – मुख्यमंत्री https://t.co/ImprYhMJl7 @CMOMaharashtra pic.twitter.com/0tptmNixXZ
— TV9 Marathi (@TV9Marathi) May 18, 2020
LIVETV – डॉक्टर, नर्स, पोलिसांना त्या त्या वेळी विश्रांती देणे गरजेचे आहे, त्यामुळे मला कोव्हिड योद्ध्यांची गरज आहे, ज्यांना कुणाला मदतीला यायचं आहे त्यांचं स्वागत आहे – मुख्यमंत्री https://t.co/ImprYhMJl7 @CMOMaharashtra pic.twitter.com/NIEiF9unUW
— TV9 Marathi (@TV9Marathi) May 18, 2020
LIVETV – मुंबईत ठिकठिकाणी बीकेसी, गोरेगाव, वरळी, रेसकोर्ट, मुलुंड, ठाणे अशा ठिकाणी केवळ कोव्हिड सेंटर नसेल तर जम्बो फॅसिलिटीचा प्रयत्न करु, सर्वांना व्हेंटिलेटरची गरज नाही पण ऑक्सिजन लागतो, त्याची व्यवस्था करतोय – मुख्यमंत्री https://t.co/ImprYhMJl7 @CMOMaharashtra pic.twitter.com/f5yxzsnUTG
— TV9 Marathi (@TV9Marathi) May 18, 2020
LIVE : राज्यात ५० हजार उद्योग सुरु करण्यास परवानगी दिली आहे. त्यात ५ लाख मजूर काम करत आहेत – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे https://t.co/ImprYhMJl7 #CMUddhavThackeray pic.twitter.com/hFuCxHAWL9
— TV9 Marathi (@TV9Marathi) May 18, 2020
#BREAKING : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे रात्री 8.30 वाजता महाराष्ट्रातील जनतेशी संवाद साधणार https://t.co/ImprYhMJl7 #CMUddhavThackeray pic.twitter.com/UoqI5qKEZf
— TV9 Marathi (@TV9Marathi) May 18, 2020
महाराष्ट्रातील लॉकडाऊनमध्ये 31 मेपर्यंत वाढ
महाराष्ट्रातील लॉकडाऊनमध्ये 31 मेपर्यंत वाढ करण्यात आली आहे. लॉकडाऊन भाग 3 च्या शेवटच्या दिवशी रविवारी (17 मे) लॉकडाऊन 4 ची घोषणा करण्यात आली. त्यामुळे आता आणखी 14 दिवसांसाठी लॉकडाऊन वाढवण्यात आला आहे. लॉकडाऊनबाबत महाविकास आघाडीच्या मंत्र्यांची गुरुवारी बैठक पार पडली होती. या बैठकीत लॉकडाऊन वाढवण्याविषयी निर्णय झाल्याची माहिती आहे. ग्रीन आणि ऑरेंज झोनमधील सवलती अधिक वाढण्याचे संकेत आहेत. तर रेड झोनमध्ये ‘कोरोना’बाबत अधिक काळजी घेतली जाणार आहे.
लॉकडाऊन वाढवताना राज्याचे आर्थिक चक्र सुरु राहण्याची काळजी राज्य सरकार घेणार आहे. यापूर्वी राज्यात काही अटी आणि नियमांसह उद्योगधंदे सुरु करण्यात आले आहेत. आणखी काही उद्योगधंदे सुरु करण्याबाबत सरकार आराखडा आखण्याची शक्यता आहे.
लॉकडाऊन कसा वाढत गेला?
CM Uddhav Thackeray On Lockdown-4.0
संबंधित बातम्या :
वाद कशाला, मोदींनी आधीच ‘त्या’ स्किमने 20 टन सोनं गोळा केलंय : पृथ्वीराज चव्हाण
केंद्राच्या दहा तुकड्या राज्यात दाखल, प्रत्येक तुकडीत 100 पोलीस : अनिल देशमुख
लॉकडाऊनमध्ये कोकणच्या पोरांची आयडिया, ग्राम पंचायतीचं टेंडर घेऊन 5 लाखाचं काम मिळवलं
Lockdown 4 | लॉकडाऊन 4 बाबत नियम काय असू शकतात? राजेश टोपे म्हणतात…..