मुंबई: भाजप नेते किरीट सोमय्या (kirit somaiya) यांनी घोटाळे आणि भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरून पुन्हा एकदा शिवसेना नेते संजय राऊत (sanjay raut) आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (cm uddhav thackeray) यांच्यावर जोरदार हल्ला चढवला आहे. माझा आज वाढदिवस आहे. जास्त लोकांना दुखवणार नाही. पण अनिल देशमुख, अनिल परब यांच्याबद्दल माहिती दिली आहे. संजय राऊतांबद्दल प्रविण राऊतांनी जे काही सांगितलंय त्यानंतर मी एवढंच सांगेन की अनिल देशमुख यांच्या डावी आणि उजवीकडील खोली उद्धव ठाकरेंनी सॅनिटाईज करावी. कारण संजय राऊत यांना लवकरच बेड्या ठोकल्या जातील आणि त्यांना आत जावं लागेल, असा इशारा किरीट सोमय्या यांनी केला आहे. त्यामुळे संजय राऊत यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सोमय्या यांनी इशारा दिल्याने त्याचे अनेक अर्थ काढले जात आहेत. सोमय्या यांना नेमकं काय म्हणायचं आहे? असा सवालही केला जात आहेत.
किरीट सोमय्या यांचा आज वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने त्यांनी टीव्ही9 मराठीशी संवाद साधला. माझं वय 69 आहे. पण मित्र म्हणतात की मी 42 चा वाटतो. आणि मला 42 चाच राहायचं आहे. वाढदिवसापेक्षा मला काळजी कोव्हिड सेंटरमध्ये उपचार घेणाऱ्यांची आहे. पण उद्धव ठाकरे यांनी कंत्राट चायवाल्याला दिलं, असा आरोप सोमय्या यांनी केला.
संजय राऊत सांगतात की डेकोरेटरचा डोक्यावर बंदूक ठेवली. आम्ही विषय काढला नाही. किती कार्यकर्म झाले? कुठे झाले? किती खर्च झाला? त्याचा हिशोब द्या. पेमेंट तुम्ही केला की बेनामी चायवाल्याने ते सांगा की बीआर शेट्टीने केला? की प्रविण राऊतचा कंपनीने केला. कुटुंबाच्या कार्यक्रमात आम्ही पडत नाही., पण तुम्ही मोदी सरकारवर आरोप केले आता हिशोब द्या, असं सोमय्या म्हणाले.
चायवाला, दारुवाला हे उद्धव ठाकरेंचे कारनामे आहेत. वाईन कंपनीसाठी पॉलिसी बदलली गेली. संजय राऊत पार्टनर बनले. जी कंपनी अस्तित्वात नाही त्यांना कंत्राट दिलं. एका चहावाल्याला कंत्राट दिलं. कोविड कंपनी कधी स्थापन झाली नाही त्यांना कंत्राट कसं दिलं गेलं? असा सवाल त्यांनी केला.
घोटाळ्यात हे सगळे पार्टनर आहेत. म्हणून एकमेकांना वाचवण्याचा त्यांचा प्रयत्न सुरू आहे. कोव्हिडमध्ये अनेकांचं कायमचं नुकसान झालं. त्याला वाचवण्यासाठी काँग्रेस इतक्या खालच्या पायरीवर जाऊ शकतं. त्यांना माझा नमस्कार, असं सांगतानाच प्रविण राऊतांपासून इतरांनी ईडीला जी माहिती दिली आहे. त्यावरून अनिल परब आणि संजय राऊत यांना लवकरच जेलमध्ये जावं लागणार आहे. मुख्यमंत्र्यांनी या दोघांसाठी अनिल देशमुखांबाजूच्या खोल्या सॅनिटाईज करून घ्याव्यात, असं ते म्हणाले.
4 मिनिटे 24 हेडलाईन्स | 4 Minutes 24 Headlines | 12 February 2022 pic.twitter.com/rXKVpyP2hd
— TV9 Marathi (@TV9Marathi) February 12, 2022
संबंधित बातम्या:
पुण्याच्या जम्बो कोव्हिड सेंटरमध्ये कोणताही भ्रष्टाचार नाही, अजित पवारांचं किरीट सोमय्यांना उत्तर
Maharashtra News Live Update : पुण्यात कोरोना रुग्णसंख्या आटोक्यात येतेय : अजित पवार